Anganewadi Jatra 2025 : भराडी देवीच बोलावणं आलं! रेल्वेच्या ताफ्याचं जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नम:ऽऽऽऽ असा जयघोष करत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. (Anganewadi Jatra 2025) प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कोरोनाच्या निर्बंधाखाली होत असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आता तोंडावर आली आहे. यंदा २२ फेब्रुवारी रोजी जत्रा पार पडणार असून देवीला कौल दाखवून ही तारीख निर्धारित करण्यात आली. दरम्यान, या यात्रेला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेने यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंगणेवाडीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुकर होणार आहे.



प्रवाशांची वाढती गर्दी आणि आंगणेवाडीच्या दिशेनं जाणारा एकंदर ओघ पाहता या गर्दीचं विभाजन करण्यासाठी म्हणन कोकण रेल्वेकडून आगामी आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. जाणून घ्या कसे असेल वेळापत्रक.




  • गाडी क्र. ०११२९ ही विशेष रेल्वेगाडी एलटीटीहून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर सावंतवाडी रोड येथे ती दुपारी १२ वाजता पोहोचेल.

  • गाडी क्र. ०११३० विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोडहून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटून मुंबई एलटीटीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.


थांबा : वरील रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, बोरत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा असेल. तर, या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असतील.




  • गाडी क्र. ०११३१ एलटीटी येथून २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, ती सावंतवाडी रोडला दुपारी १२ वाजता पोहोचेल.

  • गाडी क्र. ०११३२ ही सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.


थांबा : २२ डब्यांची ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.

Comments
Add Comment

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च

गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता

Minister Gulabrao Patil : 'डीजेच्या आवाजाने एका कानाने ४०% ऐकू येईना !’ गुलाबराव पाटलांची आपबिती; गणेशोत्सवाआधी तरुणांना आवाहन

Minister Gulabrao Patil : डीजेचा दणदणाट हा काहींसाठी उत्सवाचा जल्लोष असतो पण याच आवाजाचा त्रास किती गंभीर असू शकतो, याची आपबिती

Devendra Fadnavis : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्हा पोलिसांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय

Jalgaon Accident News : जळगावात भरधाव कंटेनर पलटी, तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : पाळधी ते तरसोद बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ताबा सुटला आणि काही क्षणांतच कंटेनर