अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा दणका

अहिल्यानगर महानगरपालिकेतील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योतीताई अमोल गाडे यांनी दणका दिला. सकाळी अचानक पाहणी करत हजेरी मस्टर तपासले आणि उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क नोंदविण्याचे निर्देश दिले. या कारवाईमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेच्या शिस्तीचा अभाव असल्याचे मंगळवारी (दि. 17 नोव्हेंबर) महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांच्या निदर्शनास आले. सकाळी 9.30 वाजता महापौर गाडे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाल्या असता, बहुतांश कर्मचारी निर्धारित वेळेत कामावर हजर नसल्याचे आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौरांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी मस्टरची तपासणी करून त्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क नोंदविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.


महापौर ज्योती गाडे यांनी उशिरा कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरी मस्टर बुक ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यावर उशिराचा शेरा मारत संबंधित कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली. तसेच महापालिकेतील विविध विभागांच्या कार्यालयांची पाहणी करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.


नागरिक आपल्या विविध कामांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकेत येत असतात. मात्र, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागत नाहीत. यावेळी पुण्याहून दाखला मिळविण्यासाठी एक महिला सकाळी पावणेदहा वाजता महापालिकेत आल्या होत्या. मात्र, ज्या विभागात त्यांचे काम होते, त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे संबंधित महिलेने नाराजी व्यक्त केली.






हा प्रकार पाहून महापौरांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच खुर्ची टाकून महापौर ज्योतीताई गाडे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयीन शिस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असताना बहुतांश कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे महापौरांनी यापुढे कर्मचाऱ्यांच्या वेळेतील अनियमिततेकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर नियमानुसार लेटमार्क नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.


महापौरांच्या या अचानक पाहणीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, लेटमार्कची नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून पुढे नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता; अन्य तालुक्यांचे संपूर्ण सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी पालकसचिवांनी

अहिल्यानगरमध्ये गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापे! 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हे

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नगर तालुक्यातील खंडाळा आणि नेप्ती परिसरात

भाड्याच्या मालमत्तेवर मालकीचा दावा? उबाठाचे किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप; 70 लाखांची मालमत्ता 33 लाखांत घेण्याचा प्रयत्न?

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील सावेडी परिसरातील वैभव कॉलनी येथील मालमत्तेच्या ताब्यावरून मालमत्ताधारक आणि

Ramayana: रामायणाच्या दुसऱ्या भागाआधी संत-अभ्यासकांना चित्रपट दाखवा; हिंदू संघटनांची मागणी

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी रामायण चित्रपटासंदर्भात मुंबई

कामगारांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या 29 सेवा आणि 18 योजनांची प्रक्रिया होणार अतिशय सुलभ; नवीन पोर्टल लवकरच होणार सुरू

मुंबई : कामगार विभागाच्या सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राज्य शासनाने एक

गडचिरोलीच्या विकासाचा मार्ग मोकळा! वैद्यकीय महाविद्यालयातील वन्यजीव परवानग्यांचे अडथळे दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर