सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार ‘एआय’ वापरणार

नवी दिल्ली : सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘एआय’चा वापर करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे' या विषयावरील संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. सायबर गुन्हे बनावट बँक खात्यांद्वारे केले जातात. यामुळे बेकायदेशीर कारवाया वाढतात. सरकार ‘एआय’च्या मदतीने अशा खात्यांवर कारवाई करेल असे शाह यांनी सांगितले.


शाह यांनी समितीला सांगितले की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय-4सी) शिफारशींनुसार 805 ऍप्स आणि 3 हजार 266 संकेतस्थळांच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. यासोबतच, 399 बँका आणि वित्तीय मध्यस्थांसह 6 लाखांहून अधिक संशयास्पद डेटा पॉइंट्स सामायिक करण्यात आले आहेत. तसेच, 19 लाखांहून अधिक बनावट बॅँक खाते आढळून आले आहेत आणि 2 हजार 38 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार ब्लॉक करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सर्व बँकांशी समन्वय साधून, सायबर गुन्हा करण्यासाठी वापरली जाणारी बँक खाती (बनावट) ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे शाह यांनी सांगितले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने भारताला सायबर-सुरक्षित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आज देशातील 95 टक्के गावे डिजिटली जोडली गेली आहेत, तर 1 लाख ग्रामपंचायती वाय-फाय हॉटस्पॉटने सुसज्ज आहेत. गृहमंत्र्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना 1930 या हेल्पलाइन क्रमांकाची जाहिरात करण्यास सांगितले. सायबर आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर, '1930' हेल्पलाइन कार्ड ब्लॉकिंगसारख्या विविध सेवा देणारा एक-बिंदू उपाय प्रदान करते, असे त्यांनी सांगितले. शाह म्हणाले की, आय4सी पोर्टलवर एकूण 1 लाख 43 हजार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, गृह मंत्रालयाचे उद्दिष्ट देशात सायबर गुन्ह्याचा एकही प्रकार घडू नये हा आहे.
Comments
Add Comment

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)