पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबविली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून १३६ रुपये घेऊन १० लाख रुपयांचा विमा उतरवला जायचा. नंतर रक्कम वाढवली होती. यात दुजाभाव केला जात होता. त्यामुळे यामध्ये बदल केला आहे. आता १ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार आहे. या पॉलिसीची मुदत ३० जानेवारी २०२५ ते २९ जानेवारी २०२६ अशी असणार आहे.


महापालिकेच्या विविध विभागांत अनेक कर्मचारी काम करतात. जवळपास २० हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता; परंतु २०१६-१७ पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. परिपत्रकानुसार ही विमा पॉलिसी जगभरात कुठेही अपघात झाला तरी वापरता येणार आहे.

Comments
Add Comment

Vasai News : मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेला, पण घरी परतलाच नाही; अखेर 12 दिवसांनी अंकितचा मृतदेह सापडला

वसई : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सुरुची बीचवर मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय अंकित

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रथम मानाचा गणपती

Cm Devendra Fadanvis News: माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार ३ हजार घरे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ठाणे: माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही

Kolhapur Ganpati Visarjan 2026 : विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना; कोल्हापुरात 21 फुटांची गणेशमूर्ती कोसळली

कोल्हापूर : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज, 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच

MPSC Paper Leak : MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई ! आणखी 4 जण अटकेत, आरोपींची संख्या 11 वर

MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पवई IIT ला भेट देणार

मुंबई : पवई आयआयटीमधील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय