Bharat Gogawale: दुष्काळग्रस्तांना रोजगाराची हमी! पात्र कुटुंबांना कामापासून वंचित ठेवू नका; मंत्री भारत गोगावले यांचे निर्देश

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो मंत्री गोगावले यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना आणि 'व्हीबी जी राम जी' अंतर्गत कामांची सर्व स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी करावी.

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो मंत्री गोगावले यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना आणि 'व्हीबी जी राम जी' अंतर्गत कामांची सर्व स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी करणारे एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये. रोजगार निर्मितीबरोबरच जलसंधारण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले आहेत.



मंत्री भारत गोगावले काय म्हणाले?


दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देणे, हे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या कामातील जबाबदारी कोणत्याही स्तरावरील अधिकाऱ्याने टाळू नये, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य शासनाने 116 कोटी रुपयांचा पूरक कुशल निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी केवळ शासनमान्य आणि निधी वितरण पत्रात नमूद केलेल्या कामांवरच खर्च करावा. पाणंद रस्त्यांच्या ज्या कामांना पूरक कुशल निधीची मान्यता दिली आहे, त्यांचीच देयके अदा करावीत. निधीच्या वापरात कोणतीही अनियमितता किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले. तर उपलब्ध निधी योग्य कामांसाठी, योग्य लाभार्थ्यांपर्यंत आणि वेळेत पोहोचविण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांचे म्हणने आहे.






पुढे बोलताना, चाऱ्याची सर्वाधिक टंचाई असलेल्या जिल्ह्यांचे तातडीने मूल्यांकन करून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करावी. कोकणात उपलब्ध गवताची कापणी सुरू करण्यात आली असून, नव्याने चारा उपलब्ध होईपर्यंत टंचाईग्रस्त जिल्ह्यांना तेथून शक्य तितका चारा पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.


'व्हीबी जी राम जी'अंतर्गत 76 कोटी रुपयांचे निधी हस्तांतरण आदेश प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 38 कोटी रुपयांची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित लाभार्थी तसेच अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतींच्या खात्यांत रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित 38 कोटी रुपयांचे प्रमाणीकरण पूर्ण करून येत्या शुक्रवारपर्यंत वितरण करण्याची कार्यवाही विभागाने करावी, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.


अकुशल कामांची मजुरी मस्टर बंद झाल्यानंतर उशिरात उशिरा सहा दिवसांच्या आत कामगारांच्या खात्यात जमा होईल, याची दक्षता घ्यावी. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांची जिल्हानिहाय कारणे तपासून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. रोजगार सेवकांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही ग्रामपातळीवरील अडचणींमुळे मानधन प्रलंबित राहू नये, असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.


विभागाचे सचिव अप्पासो धुळाज यांनी यावेळी जिल्हानिहाय आढावा घेऊन मजुरांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी, शासनाने मान्यता दिलेला आणि कमी पाण्यावर येणारा चारा लागवड करावी, ज्या जिल्ह्यांना मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे त्यांनी त्यांना रोजगार हमीअंतर्गत रुजू करून घ्यावे, असे निर्देश दिले.

Comments
Add Comment

Women Reservation in Cooperative Sector: सहकारात महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व, तरुणांसाठीही राखीव जागांचा प्रस्ताव

मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार नवीन सहकार धोरण जाहीर

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि

Bharat Scouts and Guides: देवेंद्र फडणवीस यांची 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

Ajit Pawar Tribute: अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली! एकनाथ शिंदे भावूक

पुणे:  पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती

Chipi Airport: चिपी-नवी मुंबई विमानसेवेला 16.74 कोटींचे ‘व्हीजीएफ’ अनुदान

मुंबई(सुहास शेलार): सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा चालविणाऱ्या ‘जस्ट उडो एव्हिएशन

मंत्री नितेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा आढावा; 22 योजनांच्या अंमलबजावणीवर भर

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करून तिचा लाभ अधिकाधिक मच्छीमारांपर्यंत