श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कुस्त्यांची दंगल

पहिल्याच दिवशी २५१ कुस्त्या; दोन दिवसांत लाखोंची उलाढाल


कळवण : श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून हजारो विठ्ठलभक्तांनी मंदीरात विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा करुन सुखसमृध्दीचे साकडे घातले. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै. राजाराम पगार कुस्ती आखाड्यात लहान - मोठ्या २५२ कुस्त्या प्रेक्षणीय व रंगतदार झाल्या.


स्व. नथू यशवंत पगार स्मरणार्थ अर्जुन पगार यांच्याकडून पहिल्या दिवसाची २१ हजाराची मानाची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. पहिल्या दिवसाच्या कुस्ती दंगल आखाड्याचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष कौतिक पगार,कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार , पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ,अँड परशुराम पगार, सुधाकर पगार, भाऊराव पगार,प्रा.के.के.शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बागूल,अर्जुन पगार,जयेश पगार,गोरख बोरसे,चिंधा शिरसाठ, किशोर चव्हाण ,राजेंद्र पवार, निंबा पगार,जितेंद्र पगार नितीन पगार यात्रा महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय पगार, खजिनदार राजेंद्र पगार रविंद्र पगार आदी मान्यवराच्या उपस्थितीत झाले.


येवला ,मनमाड ,भगुर ,नाशिक ,पुणे ,कोपरगाव ,सातारा ,सांगली ,आदी ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी लावली. रोख रकमेच्या तसेच आकर्षक भेट वस्तू देऊन कुस्त्या पार पडल्या. पंच म्हणून शामराव पगार,जितेंद्र पगार, नितीन पगार,अँड विनायक पगार सुरेश पगार,मोतीराम पगार , प्रदीप पगार,सचीन पगार, अमोल पगार,अमित पगार,संदीप पगार,मनिष पगार आदीनी कामगिरी बजावली.


यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी उपाध्यक्ष साहेबराव पगार ,भाऊसाहेब पगार, रामकृष्ण पगार, हर्षल पगार, सूरज पगार, नंदकिशोर पगार,चेतन पगार,गोरख पाटील, किरण पगार,मोयोद्दीन शेख, वाडेकर यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Comments
Add Comment

Aadhaar Card News: उद्यापासून सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, वाचा सविस्तर...

मुंबई: स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्तनोंदणीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता कोणत्याही दस्त नोंदणीसाठी

MPSC विद्यार्थ्यांचे 2 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन

शक्तीपीठ महामार्गासाठी १२९ गावांत जमीन मोजणी पूर्ण, ४०९ गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया; २६५ गावांत शेतकऱ्यांशी संवाद सुरू

मुंबई : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी असलेल्या संयुक्त जमीन मोजणीला १३

माजी अग्निवीरांना राज्यातील गणवेशधारी पदांसाठी विविध सवलती - लेखी, शारीरिक चाचण्यांतून सूट; वयोमर्यादेत चार वर्षांपर्यंत शिथिलता

मुंबई : सैन्यदलातील चार वर्षांची सेवा पूर्ण करून सेवामुक्त होणाऱ्या महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना

Gulabrao Patil : राज्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाईचे नियोजन, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय आराखडा सादर करण्याचे निर्देश

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य टंचाईचा

Nitesh Rane : दुष्काळात शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मच्छिमारांनाही देणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

२०२८ पासून मुंबईत ‘वॉटर मेट्रो’ कार्यान्वित करणार मुंबई : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास