Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील कामगारांची सुरक्षा 'राम भरोसे'

खेड : कोकणातील एक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या लोटे एमआयडीसीतील (Lote MIDC) असंख्य कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुरक्षा आणि किमान सुविधा 'राम भरोसे' असल्याचे भीषण वास्तव सातत्याने समोर येत आहे.


काही दिवसांपूर्वी येथील एका कंपनीच्या ठेकेदारकडून कंत्राटी कामगारांना गुलामासारखी वागणूक मिळत असल्याची घटना समोर आली. त्याआधी एका कंपनीतील दोन कामगार कंपनी आवारातच शेकोटी केल्यामुळे भाजल्याची घटना समोर आली. गेल्या दोन तीन वर्षांत अनेक कंपन्यांमधून स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे याशिवाय लहान-मोठे अपघात होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र असं असूनही कामगारांची सुरक्षा महत्त्वाची मानून ठोस उपाययोजना करण्यास कंपन्या, त्यांचे मालक, त्यांचे व्यवस्थापन टाळाटाळ करताना दिसतात. ज्यांच्या जीवावर कारखाने चालू आहेतख त्यांच्या जीवाची किंमत कंपनी मालकांच्या आणि व्यवस्थापनाच्या लेखी शून्य असल्याचे भीषण वास्तव ठळकपणे समोर येऊनही त्याकडे कोणी गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.



शासकीय यंत्रणांबद्दल बोलायलाच नको. त्यांच्या दर महिन्याच्या भेटींचा 'अर्थ' खूप मोठा आहे. एमआयडीसीचे अधिकारी, प्रदूषणचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी नेमकं काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. काही ठराविक कंपन्या सुरक्षाविषयक नियम, उपाययोजना करताना दिसतात किंवा एखादी दुर्घटना घडली तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. पण अशा कंपन्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. बहुसंख्य कारखाने, मालक बेदरकार, बेजबाबदार आहेत. त्यांचे व्यवस्थापनही त्याच प्रतीचे आहे.


स्फोट, आग, वायुगळती अशा घटना घडू नयेत म्हणून आणि घडल्या तरी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सक्षम यंत्रणा याठिकाणी नाही. त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. कामगारांना गुलामासारखे, वेठबिगारासारखे राबवायचे आणि त्यावर बक्कळ पैसा मिळवून ऐशारामात राहायचे, वेगवेगळ्या राजकीय पुढऱ्यांना हाताशी धरून दडपादडपी करायची, अशी पद्धत येथे बोकाळली आहे.


अनेक कारखाने हे भंगाराचे गोडाऊन वाटावे इतक्या वाईट परिस्थितीत चालू आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्यांची मानसिक, शारीरिक पिळवणूक होत असते. एवढं करून पुरेसा पगार हातात पडेल याची खात्री नाही.


लोटे औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रश्न फार गंभीर होत चालले आहेत. सुदैवाने उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत, अभ्यासू आहेत, प्रामाणिक आहेत, कार्यक्षम आहेत, सामान्य माणसांविषयी विशेष आस्था बाळगणारे आहेत, कामगारांच्या जीवाचे मोल जाणणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडुन फार मोठ्या अपेक्षा आहेत. येथील कारखान्याची सर्व प्रकारची ऑडिट पारदर्शकपणे झाली पाहिजेत यासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई, बेबी बंप शेअर करत दिली 'गुड न्यूज'

मुंबई: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली

Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' चित्रपटाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान चर्चा सुरू आहे.

Ganesh Chaturthi 2026 : गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी साहित्याची यादी; पूजा सुरू होण्याआधी या वस्तू घरी आणून ठेवा

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाची चिंता मिटली, मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहोत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या