Mahalaxmi Express : महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग, प्रवाशांनी चेन ओढल्यामुळे अनर्थ टळला

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान अचानक महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत चेन ओढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आग विझल्यानंतर रात्री साडेदहा नंतर गाडी पुढे नेण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी )रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेस रुकडी वळिवडे दरम्यान पंचगंगा पुलानजीक आली असता वातानुकूलित बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान, ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. यावेळी गाडीचे इंजन पंचगंगा पुलादरम्यान थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.



दरम्यान, चालक आणि गार्डने ट्रेनची पाहणी केली असता एम - २ या वातानुकूलित बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीतील आग रोधक सिलिंडरने आग विझवून ती मिरजेकडे रवाना झाली. मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एक तासाने ती मुंबईकडे रवाना झाली. ही ट्रेन रात्री साडेदहानंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Comments
Add Comment

Pandharpur Special Trains : कार्तिकी वारीसाठी भाविकांना दिलासा, मध्य रेल्वेच्या 36 विशेष गाड्या धावणार

विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे निघाले आहेत. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी होणारी गर्दी

Bharat Gogawale: दुष्काळग्रस्तांना रोजगाराची हमी! पात्र कुटुंबांना कामापासून वंचित ठेवू नका; मंत्री भारत गोगावले यांचे निर्देश

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो

Women Reservation in Cooperative Sector: सहकारात महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व, तरुणांसाठीही राखीव जागांचा प्रस्ताव

मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार नवीन सहकार धोरण जाहीर

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि

Bharat Scouts and Guides: देवेंद्र फडणवीस यांची 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

Ajit Pawar Tribute: अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली! एकनाथ शिंदे भावूक

पुणे:  पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती