चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध

कच्च्या तेलाची बेकायदेशीर मार्गाने विक्री करणा-या इराणच्या तेल उद्योगाशी संबंध


वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधित कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये चार भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे.


अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क कोट्यवधी डॉलर्सच्या कच्च्या तेलाची विक्री बेकायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांचा हा निर्णय इराणच्या कठोर धोरणांविरुद्ध आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे होणारी कच्च्या तेलाची विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.



यामध्ये ऑस्टिन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बीएसएम मरीन एलएलपी, कॉसमॉस लाइन्स इंक आणि फ्लक्स मेरीटाईम एलएलपी या भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.


मात्र, आतापर्यंत भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताचे इराण आणि अमेरिका दोन्ही देशांसोबत संबंध चांगले आहेत. भारत अमेरिका संबंध चांगले असले तरी गेल्या काही काळापासून USAID निधीमुळे तणावाचे वातावरण आहे.


ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या तेल उद्योगावर आयातींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा वाढता दबाव दोन्ही देशांतील संबंध बिघडवू शकतो असे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापार क्षेत्रात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे भारताला दोन्ही देशांसोबत संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

बुरखा आणि नकाबवर या देशात पूर्णपणे बंदी, मुस्लिमबहुल देशातही चेहरा झाकण्यावर निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी संसदेच्या पटलावर एक विधेयक मांडलं जाणार आहे.

Crime News : 'तो' 75 वर्षांचा खासदार अन् ती '19' वर्षाची पत्नी! 19 वर्षीय दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी 75 वर्षीय खासदारासह तिघांना अटक

Bangladesh News : बांगलादेशातील एका 75 वर्षीय खासदाराला त्याच्या 19 वर्षीय दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली

Pakistan Afghanistan airstrike : पुन्हा एकदा पाकिस्तानने डिवचलं, शेजारी देशांमधील हिंसाचार पुन्हा सुरू; युद्धजन्य परिस्थिती निर्माण

काबुल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. सोमवारी ईशान्य अफगाणिस्तानात पाकिस्तानने

Prime Minister Meloni : इटलीच्या शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी येणार; पंतप्रधान मेलोनींचा मोठा निर्णय, कारण असं की...

इटली : युरोपियन देशात बुरख्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. फ्रान्स, (France) ऑस्ट्रिया (Austria) आणि

Aleema Khan Arrest : लाँग मार्चची धास्ती की दबावतंत्र? पाकिस्तानात इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना अटक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून, आता

Drone Attack : युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन महाहल्ला; मॉस्कोसह विविध शहरांना लक्ष्य, १,१०० ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा

मॉस्को : युक्रेनने रशियावर १,००० हून अधिक ड्रोनच्या मदतीने भीषण हल्ला केला आहे. रशियात संसदीय निवडणुकीचा तिसरा