US flight delays : अमेरिकेतील विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. या समस्येमुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेक विमानांना विलंब होत आहे. विमान कंपन्या सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, रविवार संध्याकाळपर्यंत विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
FAA च्या प्रमुखांनी शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, हवाई वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. फ्लाइटअवेअर या विमान प्रवासाची माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, शनिवारी संध्याकाळपर्यंत अमेरिकेत 6,150 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर 7,300 हून अधिक विमानांना विलंब झाला होता. शुक्रवारीही परिस्थिती गंभीर होती. त्या दिवशी सुमारे 9,200 उड्डाणे रद्द झाली, तर 7,500 विमानांना उशीर झाला. रविवारी नियोजित असलेल्या 530 हून अधिक उड्डाणांवरही याचा परिणाम झाला.
Assembly Elections 2026 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार तारखा
Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका ...
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही या बिघाडाचा मोठा परिणाम दिसून आला. शनिवारी येथे 430 हून अधिक विमानांना विलंब झाला, तर 380 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर अडकून पडले.
FAA प्रमुख ब्रायन बेडफोर्ड यांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. रविवारअखेरपर्यंत विमानसेवा मोठ्या प्रमाणात पूर्ववत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने विमान कंपन्यांना विमाने, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन पुन्हा करावे लागत आहे.
दरम्यान, शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे FAA ने अमेरिकेतील विमानांची उड्डाणे काही काळ थांबवली होती. त्यामुळे जवळपास 5 तास विमान वाहतुकीवर परिणाम झाला. अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील हार्डवेअर जुने असल्याचे सांगितले. या समस्येमागे सायबर हल्ला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.