Pakistani policemen : चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सेवा देण्यास नकार; १०० हून अधिक पाकिस्तानी पोलीस बडतर्फ

लाहोर : पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नाहीत.आता पीसीबीसमोर आणखी नवं आव्हान उभं राहिलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस दलातील १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०२५ दरम्यान सुरक्षा कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्यामुळे या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.



पंजाब पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान अनेकदा काही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर राहिले नाहीत. गैरहजेरीचे अनेक प्रकार आढळून आले आहेत. अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. वेगवेगळ्या संघांना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधून हॉटेल्सकडे जाताना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, या पोलिसांपैकी अनेकजण गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं आहे. तर, काहींनी ही जबाबदारी घेण्यास थेट नकार दिला. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.



नकार देण्याचं कारण काय?


या कारवाईबाबत कोणत्याही प्रकारचं अधिकृत वक्तव्य अथवा निवेदन समोर आलेलं नाही. त्याचबरोबर बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावण्यास नकार का दिला हे देखील समजलेलं नाही. पाकिस्तानमधील काही स्थानिक माध्यमांनी दावा केला आहे की हे पोलीस गेल्या कित्येक महिन्यांपासून सेवा देत आहेत. तसेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान त्यांचे कामाचे तास वाढले आहेत, त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अनेकांना आठवड्याच्या रजा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

Comments
Add Comment

Israel Hamas Conflict : 7 ऑक्टोबर हल्ल्याचा सूत्रधार संपवला? इस्रायलच्या कारवाईने हमास हादरला

जेरुसलेम : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून इस्रायली लष्कराने हमासला सर्वात मोठा धक्का दिला

Miami Airport: अमेरिकेतील मियामी विमानतळावर दोन विमान एकमेकांना धडकली, 2 प्रवासी जखमी; नेमकं काय घडलं?

मुंबई: अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री (14 नोव्हेंबर 2026) दोन विमानांमध्ये टक्कर झाली.

SpaceX Video : एलॉन मस्क यांच्या SpaceX ने रचला नवा इतिहास! अंतराळातून वेगात परतणारं Starship हवेतच पकडलं

SpaceX : अंतराळ क्षेत्रात स्पेसएक्सने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीचे स्टारशिप

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी

US flight delays : अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत! हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ

US flight delays : अमेरिकेतील विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या

अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या भारतीय तरुणाला 30 वर्षांची शिक्षा, अल्पवयीन सांगून करायचा ब्लॅकमेल

ब्रिटन: ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या 27 वर्षीय भारतीय वंशाच्या बिलाल काझी या तरूणाला अल्पवयीन मुलींना आपल्या