सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली

बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई - बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिने तपास पथकाशी बोलताना धक्कादायक कबुली दिली. सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन धडे घेतल्याचे रान्या रावने सांगितले. तस्करीसाठी सोनं कसं लपवायचं, कोणत्या देशातून सोनं कसं आणायचं याचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ यू ट्युबवर आहेत. हेच व्हिडीओ बघितले आणि आधी सोनं लपवण्याचे तंत्र आत्मसात केले. नंतर तस्करीला सुरुवात केली, अशी कबुली रान्या रावने तपास पथकासमोर दिली.



यू ट्युबवरील ऑनलाईन व्हिडीओ ट्युटोरियल सोन्याच्या तस्करीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक असल्याचे रान्या रावने सांगितले. सोन्याच्या तस्करीसाठी विदेशी तस्करांची मदत मिळाल्याचीही रान्या रावने कबुली दिली. रान्या रावची सोन्याच्या तस्करी प्रकरणी २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.



वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले. रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत होती त्यावेळी तिला अटक झाली.
Comments
Add Comment

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसचा धक्कादायक प्रकार! ब्रेकशिवाय तब्बल 463 किमी धावली ट्रेन, रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू

देशातील आधुनिक आणि वेगवान रेल्वे सेवांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत सुरक्षेच्या

भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी नामसाईत दाखल; 20 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनाची संधी

नामसाई : भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी 14 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथील प्रसिद्ध गोल्डन

25 लाख तरुणांना मोफत टॅब्लेट, 1 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यकाळावर उपस्थित केले प्रश्न

लखनौ : उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्वामी विवेकानंद

लग्नासाठी कॅनडातून 61 वर्षीय महिला भारतात; प्रियकराने नकार देताच पोहोचली थेट पोलीस ठाण्यात!

प्रेमाला सीमा नसतात असे म्हणतात, पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा परिकथेसारखाच होईल असे नाही. डेटिंग ॲपवर ओळख

Madurai Crime: तनिष्क शोरूम चोरीप्रकरणी मोठा खुलासा! इन्फ्लुएन्सर प्रेयसीसह आरोपीच्या वडिलांनाही अटक

तनिष्क शोरूममधील दागिन्यांच्या चोरीप्रकरणी मदुराई शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी निशांतची

Rajasthan Railway Track Blast: राजस्थानमध्ये रेल्वे उडवण्याच्या कटातील दोघांना पंजाबमधून अटक

चंदीगड: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोट प्रकरणात पंजाबमधून दोघांना अटक