भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी 'ரூ' चिन्ह लावले

चेन्नई : तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तामीळ विरुद्ध हिंदी हा भाषावाद आणखी तीव्र झाला आहे. तामीळनाडूत द्रमुक (इंडी आघाडी) सत्तेत आहे तर केंद्रात भाजपाच्या (एनडीए) नेतृत्वातले सरकार आहे. द्रमुक सरकारने भाषावादात स्वतःची भूमिका आणखी कठोर केली आहे. तामीळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या शुक्रवारी १४ मार्च रोजी जाहीर होणार असलेल्या २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे.



नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे राज्यावर हिंदी लादल्याच्या आरोप करणाऱ्या तामीळनाडूतील द्रमुक सरकारने रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तामीळनाडू हे देशातील पहिले राज्य झाले आहे जिथे रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. स्टॅलिन सरकारने अद्याप अर्थसंकल्पातील बदल या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण भाजपाने तामीळनाडू सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. द्रमुकच्या नेतृत्वातील तामीळनाडू सरकारची कृती ही भारतापासून वेगळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली. भाषावाद निर्माण करुन द्रमुक स्वतःच्या अपयशांकडून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधू इच्छिते, अशीही शक्यता भाजपाने व्यक्त केली. तर तामीळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे, असे द्रमुकचे नेते सरवनन अन्नादुराई म्हणाले. त्यांनी तामीळनाडू सरकारच्या कृतीत काहीही बेकायदा नसल्याचा दावा केला.



तामीळनाडूत २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात मुख्य लढत द्रमुक विरुद्ध अण्णाद्रमुक अशी आहे. पण भाजपा मागील काही काळापासून राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ताजा भाषावाद निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?