‘आयुष्मान भारत’साठी वयोमर्यादा ७० वरून ६० करण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी वयोमर्यादा ६० वर्षे असावी. तसेच उपचारासाठी देण्यात येणारी ५ लाखांची रक्कमही दुप्पट करून १० लाख करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय समितीने केंद्र सरकारला केली आहे. सध्या फक्त ७० वर्षांच्या वृद्धांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.



राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय समितीने केंद्र सरकारला ही शिफारस केली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा. आरोग्य सेवेवर होणारा प्रचंड खर्च लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संसदीय स्थायी समितीने राज्यसभेत आपला १६३ वा अहवाल सादर केला. तसेच ही शिफारस केली आहे.



संसदीय समितीने निदर्शनास आणून दिले की, आयुष्मान भारत अंतर्गत अनेक चाचण्या आणि उच्च दर्जाचे उपचार समाविष्ट नाहीत. समितीने शिफारस केली आहे की, योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या उपचाराचे पुनरावलोकन केले जावे. गंभीर आजारांच्या उपचारांशी संबंधित नवीन पॅकेज/प्रक्रिया आणि रेडिओलॉजिकल डायग्नोस्टिक्स (सीटी स्कॅन, एमआरआय आणि न्यूक्लियर इमेजिंग) सारख्या महागड्या तपासण्या/निदानांचा समावेश योजनेत करावा.

जगातील सर्वात मोठी विमा योजना

दरम्यान, केंद्राने २०१७ मध्ये ही योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे. या योजनेंतर्गत देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. आयुष्मान योजनेंतर्गत जुनाट आजारांचाही समावेश होतो. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि त्यानंतरचा खर्च यात समाविष्ट आहे. यामध्ये वाहतुकीवरील खर्चाचा समावेश होतो. यामध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Disha Salian CBI probe : 'आता तरी सत्य बाहेर येईल ही १००% आशा', मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Saliyan) हिच्या संशयास्पद मृत्यू

Air Vice Marshal Shakti Sharma : महिला शक्तीचा नवा अध्याय! शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शलपदी ऐतिहासिक बढती

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या इतिहासात महिला अधिकाऱ्यांसाठी नवा अध्याय सुरू झाला आहे. एअर व्हाइस मार्शल शक्ती

Air India Express new Look : एअर इंडिया एक्सप्रेसचा भन्नाट मेकओव्हर! भारतीय वस्त्रपरंपरेची खास झलक!

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) आपल्या केबिन क्रू आणि विमानतळावरील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आणि अत्यंत

Sonu Sood : ‘संकटात नेहमी मदतीचा हात!’ अभिनेता सोनू सूद नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला!

नेपाळमध्ये आलेल्या भीषण (Nepal Flood) पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक लोकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, तर अनेक जण

Mamata Banerjee Niece : ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू

बीरभूम : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातील ३१

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

भुवनेश्वर : ओडिशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती कोसळण्याच्या