Nilesh Rane : महायुतीच्या वतीने कुडाळमध्ये शिमगोत्सवाचे आयोजन

आमदार निलेश राणे यांची संकल्पना


सिंधुदुर्ग : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने कुडाळ येथे "शिमगोत्सव २०२५" कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २९ मार्च रोजी सायं. ६ वाजता येथील तहसीलदार कार्यालय नजीकच्या क्रीडासंकुल मैदानावर रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर रविवार ३० मार्च रोजी सायं. ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त शहरात नववर्ष स्वागतपर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील चित्ररथ देखावे सहभागी होणार आहे, अशी माहीती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.


कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कुडाळकर बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर व अरविंद करलकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.



श्री.कुडाळकर म्हणाले, काही वर्षांपूर्वी शिमगोत्सव ही संकल्पना आपण मांडली होती. सुरूवातीला या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. होळीही मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. यावर्षीही कुडाळ येथे शिमगोत्सव कार्यक्रम घेण्याची संकल्पना स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दर्शवित महायुतीच्या बॅनरखाली भरगच्च कार्यक्रम घेण्याचे त्यांनी आश्वासित केले. त्यांनी या कार्यक्रमाला सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.


कोकणात शिमगोत्सवात रोंबाट, राधानृत्य, सोंगे आदी पारंपारिक लोककला प्रकार ग्रामीण भागात पाहावयास मिळते. ही लोककला शहरवासियांना पाहता यावी, या लोककलेचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या लोककलेला राजाश्रय मिळावा, हा आमचा या स्पर्धेमागील हेतू आहे. शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ६ वाजता येथील तहसीलदार कार्यालय नजिकच्या मैदानावर शिमगोत्सव कार्यक्रम अंतर्गत रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चलचित्रे, चित्ररथ देखाव्यांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या रक्कमेची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तसेच चित्ररथ देखावे संघ आणि सर्व सहभागी संघांना उचित मानधनही देण्यात येणार आहे.


या कार्यक्रम प्रसंगी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आ.दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, महायुतीतील नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त कुडाळ शहरात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गासह गोवा व अन्य भागातील चलचित्रे, चित्ररथ देखावे सहभागी होणार आहेत, असे श्री.कुडाळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; गडचिरोलीला विकासाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

गडचिरोली: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस

पाकिस्तानी फॅन्सही ओरडले 'सेहवाग-सेहवाग'! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!

Aryavir Sehwag Viral Video : अंडर 19 आशिया कपच्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा पराभव करत ऐतिहासिक जेतेपद

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Birsa Munda Jayanti 2026: गडचिरोलीतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! 'पूर्वी परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे उत्सव'

Birsa Munda Jayanti 2026: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस

IND vs NZ 5th ODI : फिल्डिंगचा बादशाह विराट कोहलीकडून मोठी चूक; सोपा झेल सोडताच गौतम गंभीर संतापला...

Virat Kohli dropped catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचव्या आणि अत्यंत निर्णायक

WhatsApp चे नवे फीचर! आता फोटो-व्हिडिओशिवाय स्टेटसवर शेअर करता येणार लोकेशन

Whats App New Feature: व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सतत नवीन फीचर्सवर काम करत असते. याच अनुषंगाने,