GATE 2025 Result : यंदाच्या GATE परीक्षेचा निकाल जाहीर! 'असा' पहा रिझल्ट

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT-R) ने अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) चा निकाल जाहीर झाला आहे. रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे हा निकाल जाहीर (GATE 2025 result) करण्यात आला आहे. हा निकाल gate2025.iitr.ac.in आणि goaps.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला असून उमेदवार आता त्यांच्या लॉगिनचा वापर करून तपासू शकणार आहेत.



निकाल कसा पहावा?


परीक्षार्थी विद्यार्थ्यांना GOAPS पोर्टल वेबसाइट - gate2025.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी आयडी किंवा ईमेल पत्ता आणि पासवर्ड यासारख्या आवश्यक क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. त्यानंतर ‘GATE २०२५ निकाल’ टॅबवर क्लिक करा. GATE चा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्यांना भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करून सेव्ह करावा लागेल.


दरम्यान, उमेदवारांनी GATE २०२५ चा निकाल डाउनलोड करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स विसरले असतील, तर अधिकृत वेबसाइट - gate2025.iitr.ac.in वर विसरलेले क्रेडेन्शियल्स परत मिळवण्यासाठी एक टॅब आहे. उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीने लॉग इन करावे लागेल आणि नोंदणी आयडी परत मिळवावा लागेल.


२०२५ साठी पात्रताधारक GATE कटऑफ उमेदवाराच्या तपशीलांसह आणि मिळालेल्या गुणांसह प्रदान केला जाईल. स्कोअरकार्डमध्ये परीक्षेच्या प्रत्येक विभागात उमेदवाराने मिळवलेले गुण, एकूण गुण आणि अखिल भारतीय रँक (AIR) यांचा समावेश असेल. अर्जदारांनी लक्षात ठेवावे की स्कोअरकार्ड फक्त कटऑफ स्कोअर पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्यांसाठीच जारी केले जाईल. (GATE 2025 Result)

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि