खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये भरघोस वाढ

नवी दिल्ली : मार्च महिना संपत आला आहे. आर्थिक वर्ष २०२४ - २५ संपणार आहे. यामुळे नोकरी करत असलेल्यांना पगारवाढीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी आली आहे. तब्बल सात वर्षांनंतर खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. पगारवाढीची अधिसूचना जारी झाली आहे.



आधी खासदारांचा मासिक पगार एक लाख रुपये होता. आता खासदारांचा मासिक पगार एक लाख २४ हजार रुपये असेल. खासदारांचा दैनिक भत्ता सध्या दोन हजार रुपये आहे जो वाढीनंतर अडीच हजार रुपये होणार आहे. खासदारांचे निवृत्ती वेतन आधी दरमहा २५ हजार रुपये होते, आता ते दरमहा ३१ हजार रुपये असेल. जर खासदार म्हणून पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले असेल तर आधीच्या कार्यकाळातील प्रत्येक वर्षासाठी आधी दरमहा दोन हजार रुपये निवृत्ती वेतन होते ते आता दरमहा अडीच रुपये एवढे मिळेल.



महागाई दरात वाढ झाल्यामुळे वेतन आणि भत्ते वाढविण्यात आले आहेत. हा निर्णय २०१८ पासून लागू केलेल्या नियमांतर्गत घेण्यात आला आहे, ज्यामध्ये दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्याची तरतूद आहे. हा आढावा महागाई दरावर आधारित आहे.



खासदारांना ७० हजार रुपये मतदारसंघ भत्ता देखील मिळतो. २०१८ च्या दुरुस्तीनुसार, हे पैसे खासदारांना मतदारसंघातील जनसंपर्क खर्च म्हणून दिले जातात. याशिवाय, त्यांना दरमहा कार्यालयीन भत्ता म्हणून ६०,००० रुपये आणि संसदीय अधिवेशनादरम्यान दैनिक भत्ता म्हणून २००० रुपये मिळतात. हे भत्तेही आता वाढवले ​​जातील.

याआधी कर्नाटक विधानसभेने मुख्यमंत्री, मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांच्या पगारात वाढ करण्याची तरतूद करणारे विधेयक मंजूर केले. या विधेयकात विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्षांचे मासिक वेतन ७५ हजार रुपयांवरून १.२५ लाख रुपये करण्यात आले.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि