Ajit Pawar : फुटबॉल खेळावा तशी लाथा बुक्क्यांची मारहाण; असले प्रकार खपवून घेणार नाही!

बारामतीतील त्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप


बारामती : बारामतीमधील (Baramati News) एका हॉटेल मॅनेजरला काही जणांनी बेदम मारहाण (Crime) केल्याची घटना घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडल्या तर आपण थेट मकोका लावू, असा इशारा अजित पवारा यांनी दिला आहे.



मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. फुटबॉल कसा खेळाला जातो तसा ते लाथा बुक्क्या मारत चालले होते. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.



त्याचबरोबर असे काही गुन्हे लागतील की ते सतत अशे गुन्हे करत राहिले तर पुढे मोकका पण लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तर मेहरबानी करा कोणीही कायदा हातात घेऊ नका, कोणी काही चुकीच कैलं तर पोलिसांकडून येऊन तक्रार करा असे आवाहन त्यांनी केलं. १४ तारेखेला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाची ७५ वर्ष पूर्ण झाली आहे, तरी काहीकाही जण स्वतःच्या घरीची मालमत्ता असल्यासारखं एखाद्याला बदडून काढत आहेत. हे होता कामा नये. असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.



पालकांनी आपली मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवावे


तुमची मुलं काय करताहेत कुठं चुका करताहेत हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबादारी पालकांनी पार पाडवी मग मला मुंबईला फोन येतात. दादा चुकलं एकदा पोटात घ्या. आरं पोट फुटायला लागलं आणि काय म्हणतो पोटात घ्या, अशी मुश्किल टिपण्णी देखील अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा काही शरम काही कशी वाटत नाही. एवढे त्याला बेदम मारलं. यामुळे शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही, असे देखीलb ते म्हणाले. (Ajit Pawar)


Comments
Add Comment

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे