Viral Video : निरोप समारंभाचे भाषण करतेवेळी महाविद्यालयात विद्यार्थिनीचा मृत्यू

धाराशिव : परांडा तालुक्यातील शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभ सुरू होता. या समारंभात बोलतेवेळी २० वर्षांच्या वर्षा खरात हिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बोलता बोलता वर्षा स्टेजवर कोसळली. डॉक्टरांनी तपासून वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.





वर्षा निरोप समारंभात भाषण करत होती. ती भाषणाला उभी राहिली तेव्हा तिला कसला त्रास होत आहे, असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे बोलता बोलता ती कोसळली तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण चक्रावले. डॉक्टरांनी वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर उपस्थितांना धक्का बसला.



निरोप समारंभाच्या भाषणात वर्षाने शिक्षकांचे आभार मानले. ती महाविद्यालयातील मैत्रिणी आणि शिक्षक यांच्यासंदर्भात बोलत होती. बोलत असताना ती कोसळली.

वर्षा स्टेजवर पडताच उपस्थितांपैकी काही जण स्टेजच्या दिशेने धावले. त्यांनी वर्षाला उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना वाटले की चक्कर आल्यामुळे वर्षा स्टेजवर कोसळली आहे. प्रत्यक्षात भलतेच घडले होते. वर्षाची श्वसन प्रक्रिया थांबल्याची जाणीव होताच तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वर्षी वर्षाच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अखेरचा श्वास घेण्याआधीपर्यंत वर्षाने कधीही छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली नव्हती. सध्या वर्षा कोणतेही औषध घेत नव्हती. यामुळे अचानक हृदयवाराचा तीव्र झटका कसा आला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Comments
Add Comment

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ