शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

तीन दिवसीय उत्सवात तीन लाख ७२ हजार लाडू पाकिटांची विक्री


शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.५ एप्रिलपासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता काल सोमवार दि.७ एप्रिल रोजी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडून करण्यात आली. या तीन दिवसीय उत्सवात ७४ लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.


दरम्यान,सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ६.५० वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती मुख्य कार्यकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुविधा पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ७ वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविध्य पत्नी वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री राम नवमी उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी १० वाजता ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.गोरटे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील होते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब होते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली.दुपारी १ ते ३ या वेळेत द गोल्डन व्हॉइस स्टुडिओज मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम दुपारी ३.३० ते ५ .३० या वेळेत श्रीमती पुजा राठोर, जयपुर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव कालावधीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला.


संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्री १० वाजता शेजारती झाली.श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज,मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे,वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश वक,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि