Tahira Kashyap Breast Cancer Relapse : अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला दुसऱ्यांदा कॅन्सरचं निदान

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, चित्रपट निर्माती व लेखिका ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) ७ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती. मात्र आता दुर्दैवाने तिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. आता पुन्हा एकदा तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. ताहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तसंच यावेळीही हिंमतीने याचा सामना करणार असा तिने विश्वास दर्शवला आहे.


ताहिराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिला पुन्हा कर्करोग झाल्याची माहिती तिने दिली आहे. “सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड…मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय,” असं ताहिराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.







या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "आयुष्यात जे जे काही वाट्याला येतं त्यातून काहीतरी चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यातून तुम्हालाही आनंद मिळणार असतो आणि यापुढेही तुम्ही चांगलंच कराल ही तुम्हाला खात्री असते. जागतिक आरोग्य दिन असो वा नसो स्वत:ची शक्य तितकी काळजी घ्या. नियमित तपासणी करा. मॅमोग्रामला घाबरू नका. पुन्हा एकदा कॅन्सरला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. चला."


ताहिराला २०१८ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने उपचार घेऊन यावर मात केली. नंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि ती तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसली. तिने स्तनांच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीरावर झालेल्या खुणा दाखवल्या होत्या. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने उपचारादरम्यान केस गेले तेव्हाचे टक्कल असलेले फोटो पोस्ट केले होते.

Comments
Add Comment

72nd National Film Awards : ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये; दिल्लीची परंपरा मोडणार? परेश रावल म्हणाले...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा यंदा प्रथमच

Haivan Movie : ‘हैवान’मध्ये अक्षय-सैफ आमनेसामने; ताकद की चातुर्य, कोण ठरणार वरचढ?

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील थ्रिलर चित्रपट अनेकदा त्यांच्या अनपेक्षित वळणांसाठी (twists) आणि गूढतेसाठी ओळखले

R Madhavan US Open : आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच; आर्थर ॲश स्टेडियमवर ठरला एकमेव भारतीय सेलिब्रिटी

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरात ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या

Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या अतरंगी वक्तव्यांमुळे, सोशल मीडियावरील

Cine Kind Awards 2026 : सिनेविश्वातील सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव; वामिका-जॉन-रवीना यांना ‘सिने काइंड अवॉर्ड्स’ने सन्मानित

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक कार्ये आणि संवेदनशीलता यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा गौरव

Box Office Collection : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! जगभरात 200 कोटींचा टप्पा पार

Mumbai : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि