अजय देवगणसह अवघ्या बॉलिवूडला लव फिल्म्सच्या 'देवमाणूस'ची भुरळ

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे.


आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन करत, ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते...?, असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.




लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Bigg Boss Controversy : सलमान खानच्या ‘बिग बॉस’वर सुनील पालची बोचरी टीका! म्हणाला; ‘भाईजान, हा गटर शो आधी बंद करा!’

मुंबई : कॉमेडियन सुनील पाल आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का

Shak: Trust No One Review : मुलीच्या शोधात निघालेली एक जिद्दी आई! परिणीती चोप्राच्या थ्रिलरमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स; पण...

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नेटफ्लिक्सवरील 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या नवीन मिस्ट्री-थ्रिलर

Ranbir Kapoor First Look in 'Love & War' : 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामधून रणबीर कपूरचा रुबाबदार लूक समोर; आलिया भट्टसह विकी कौशलही झळकणार

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित 'लव्ह अँड वॉर' (Love and War) या चित्रपटाची

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ची डिजिटलवर मोठी झेप ! सलमान खानचं 'ते' वक्तव्य अन् 2 कोटी व्ह्युअर्सचा टप्पा पार

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी या सीझनची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता या चर्चेला डिजिटल

BMC Notice : अभिनेता अजय देवगण मोठ्या अडचणीत! मुंबईतल्या अलिशान बंगल्यावर थेट BMC ची कारवाई, नक्की काय घडलं?

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावरून नवा वाद समोर आला आहे. कपोळ को- ऑपरेटिव्ह हाउसिंग

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र