Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!

मुंबई : मुंबईत आजही चोरांचा सुळसुळाट कायम आहे. रात्री अपरात्री, गर्दीच्या ठिकाणी संधी साधून चोर सफाईने चोरी करून पलायन करतात. काहींना पकडण्यात यश येतं तर काही पोलिसांच्या हातून सहज निसटतात. बदलत्या तंत्रज्ञानामुळे अशा लुटारूंना पकडणे अधिक सोपे झाले आहे. मात्र काही लुटारू हे पकडले जाऊ नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर हल्ला देखील करतात. अशीच एक घटना मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस घडली. अंधारात संधी साधून एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून, त्याच्यावर हल्ला करून दोन लुटारुंनी दुचाकी आणि मोबाईल पळवला. या घटनेसंदर्भात तरुणाने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तपासादरम्यान कोणताही पुरावा हाती लागला नाही मात्र या तपासामध्ये एक महापालिकेची कचऱ्याची गाडी गेम चेंजर ठरली.



मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील भाबुदे ४ एप्रिल रोजी रात्री दुचाकीवरून पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रवास करत होता. प्रवासादरम्यान काही लुटारुंनी जाणूनबुजून धक्का मारून स्वप्नीलला थांबवले. त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. या घटनेची तक्रार स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र काळोख असल्याने पोलिसांना चोरांची ओळख पटली नाही. घडलेल्या प्रकाराने गोंधळल्याने स्वप्नील याला आरोपींची शरीरयष्टी व कपड्याबाबत काहीही सांगता येत नव्हते. पोलिसांनी तपास कौशल्य पणाला लावून वारंवार स्वप्नीलकडून माहिती जाणून घेतली. घटनेच्या वेळी बाजूने रस्त्यावरील कचरा साफ करणारी गाडी, छोटा टेम्पो, ट्रक व काही गाड्या गेल्याचे स्वप्नील सांगत होता. त्यानुसार, टोलनाक्यावरील फुटेजमधून कचरा साफ करणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळाला. या गाडीचा चालक आणि दोन कामगार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कचरा गाडीला कॅमेरा असल्याचे सांगितले. कचरा साफ करणाऱ्या गाडीवरील कॅमेऱ्यात मारहाण करणारे दोघे आणि त्यांच्याकडील दुचाकी दिसली. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Comments
Add Comment

BMC News: आग, अपघात, झाड कोसळल्यास संपर्कासाठी मुंबई फायर ब्रिगेडचे पर्यायी नंबर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नागरिकांना आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे, पाण्यात बुडण्याच्या घटना

मुंबईत तीन ठिकाणी फुटणार आता वाहतूक कोंडी; तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या

मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावा; विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश

मुंबई:

FDA Raids : सणासुदीत भेसळखोरांना दणका; खाद्यतेल, पनीर, खवा... FDA च्या धडक कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त

मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध

Maharashtra Politics News : उसनवारी नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर मंत्री कार्यालयांत ‘सावधि’ पदांना मंजुरी!

मुंबई : मंत्री कार्यालयांतील उसनवारी आणि मौखिक नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर निर्माण झालेली मनुष्यबळाची

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपींना मुंबई न्यायालयाने 31 ऑक्टोबर