साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट


शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका भक्ताने तब्बल ६८ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटाचे वजन आहे ७८८.४४ ग्रॅम, आणि त्यावरील आकर्षक नक्षीकाम साईभक्तीच्या गहिर्या भावनांचे प्रतीक आहे.


या संदर्भात माहिती देताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, हा सुवर्ण मुकुट शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी साईचरणी अर्पण करण्यात आला. आणि या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.



शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती श्रद्धेचा महासागर आहे. ज्याला कोणीही पार करू शकत नाही… इथं आलेला प्रत्येकजण आपली वेदना, आपली आशा, आपली प्रार्थना साईचरणी अर्पण करून जातो – आणि त्या बदल्यात मिळते अंतःकरणाला शांती, समाधान.


शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान असून देश-विदेशातून कोट्यवधी भाविक इथे दररोज येतात. केवळ सुवर्ण मुकुटच नव्हे, तर सोने, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू आणि रोख स्वरूपातील देणग्यांचा वर्षाव साईबाबांच्या चरणी सातत्याने होत असतो.


अशा या अद्भुत भक्तीच्या ओढीमुळे, साईंचं मंदिर केवळ संगमरवरी चौकटीत बांधलेलं स्थान न राहता, ते लाखो लोकांच्या हृदयात खोलवर कोरलं गेलेलं श्रद्धास्थान बनलं आहे.


"साईंच्या कृपेनं सगळं मिळतं, मग आपण जे काही मिळवलं, ते त्यांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही" – ही भावना त्या भक्ताच्या देणगीतून प्रत्ययास येते.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच,