भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. एवढेच नाहीतर, या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घातली जाऊ शकते.


यासंदर्भातील माहितीनुसार दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा येत्या जूनमध्ये भारतात खेळली जाणार होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू रांचीला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला होता. आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. याआधी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु, पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.


दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात येण्यासाठी दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधून एकूण ४३ खेळाडूंची नावे पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये भालाफेकपटू अर्शद नदीमचे याच्याही नावाचा समावेश आहे.

Comments
Add Comment

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Ahilyanagar Kho-Kho Championship: ४० वर्षांनंतर नगरमध्ये रंगणार राज्य खो-खो स्पर्धेचा थरार; २८ नोव्हेंबरपासून ४८ संघांमध्ये चुरस!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहराला पुन्हा एकदा पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी, न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यात नको ते घडलं

[caption id="attachment_1074904" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले.

भारताच्या 244 धावांनी पराभवानंतर गौतम गंभीर संतापला; कोहली, रोहित आणि अय्यरच्या फलंदाजीवर टीका

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 89 धावांत डाव आटोपला आणि तब्बल 244

IND vs NZ 4th ODI: भारताने 244 धावांनी सामना गमावला आणि नकोसे विक्रम केले नावावर, वाचा काय ते

[caption id="attachment_1074798" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने

IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला...

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात कमबॅक केलं आणि भारताला 244 धावांनी पराभूत केलं. खरं तर न्यूझीलंडसाठी हा सामना