विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी, न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यात नको ते घडलं

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 244 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यात विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला.

1/5 न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मैदानात हजेरी लावली आणि तंबूत परतले. पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर तंबूत होते. यात विराट कोहली शून्यावर बाद झाला आणि सचिनच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. (Photo: ANI)

2/5 वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर इतकाच शून्यावर बाद झाला आहे. सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये 20 वेळा शून्यावर बाद झाला आहे. आता या विक्रमाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहलीही 20वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo: ANI)

3/5 पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. त्यामुळे डाव सावरण्याचं त्याचावर दडपण होतं. विराट कोहलीने तीन चेंडू खेळले, पण चौथ्या चेंडूवर विकेट दिली. मॅट हेनरी आत येणाऱ्या चेंडूवर चुकला आणि स्टम्प उडाल्या. (Photo: ANI)

4/5 विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याची बॅट काही चालली नाही. मागच्या चार वनडे सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद झाला. (Photo: ANI)

5/5 विराट कोहली यापूर्वी न्यू चंदीगड येथील मैदानात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नव्हता. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केलं होतं. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

भारताच्या 244 धावांनी पराभवानंतर गौतम गंभीर संतापला; कोहली, रोहित आणि अय्यरच्या फलंदाजीवर टीका

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 89 धावांत डाव आटोपला आणि तब्बल 244

IND vs NZ 4th ODI: भारताने 244 धावांनी सामना गमावला आणि नकोसे विक्रम केले नावावर, वाचा काय ते

[caption id="attachment_1074798" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने

IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला...

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात कमबॅक केलं आणि भारताला 244 धावांनी पराभूत केलं. खरं तर न्यूझीलंडसाठी हा सामना

IND vs NZ 4th ODI: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सरशी, भारताला 244 धावांनी केलं पराभूत

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकूनही भारताला

IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना माऊंट माऊगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने

W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनेड सामना बे ओव्हलच्या माऊंट माऊंगनाई येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा