Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम


बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी क्लासिक (NC Classic) भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने सोमवारी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आमंत्रण दिले होते. पण मंगळवार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्यांना ठार करण्यात आले. तब्बल २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाला धक्का बसला. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू झाली आणि नीरज चोप्राचे सोमवारी दिलेले आमंत्रण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

पाकिस्तानच्या भालाफेकपटूला भारतातील स्पर्धेसाठी विशेष आमंत्रण दिल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका सुरू झाली. अखेर नीरजने ट्वीट करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

मी मितभाषी आहे. पण चुकीचं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध बोलतो. माझ्या देशप्रेम आणि निष्ठेविषयी कोणी शंका उपस्थित करत असेल अथवा प्रश्न विचारत असेल तर मला बोलावंच लागेल. नाहक माझ्याविषयी अथवा माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामी करणारी वक्तव्य होत असतील तर ती खोडून काढावीच लागतील.

ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताकडून मी सहभागी झालो. आमच्या कामगिरीनंतर दोघांच्या आयांची एकमेकींशी भेट झाली, त्यावेळी अनेकांनी या क्षणांचे विशेष कौतुक केले. आज अर्शदला एका स्पर्धेसाठी भारतात आमंत्रित केले तर थेट माझ्या आणि माझ्या आईच्या देशप्रेमावरच शंका उपस्थित केली जात आहे. हे खूप जास्त होत आहे.

अर्शदला आमंत्रण दिले ते एक खेळाडू म्हणून. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला अशा स्वरुपाचे हे आमंत्रण होते. हे आमंत्रण सोमवारी २१ एप्रिल रोजी दिले होते. जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती. पण मंगळवारी पहलगाममध्ये जे घडले त्यानंतर अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उरलेला नाही. देश, देशप्रेम, देशाविषयीची निष्ठा हे कधीही सर्वोच्चच असेल, असे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला.



मला विश्वास आहे की आपल्या देशाचा प्रतिसाद एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवेल आणि न्याय मिळेल..." ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि न्याय मिळेल, असे नीरजने ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

त्याने पुढे लिहिलं, 'मी अभिमानाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेंव्हा माझ्या देशप्रेमावर शंका उपस्थित होते, तेव्हा ती वेदना एकदम खोलवर पोहोचते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. आम्ही साधे आणि शांत लोक आहोत. माझ्याविषयी काही माध्यमांनी बनवलेल्या खोट्या बातम्या मी खोडून काढत नाही, याचा अर्थ त्या सत्य आहेत, असं नाही.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा