खारदांडा स्मशानभूमी पुन्हा बंद, सहा महिन्यांपूर्वीच केली होती दुरुस्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ही स्मशानभूमी येत्या गुरुवारी १ मे पासून ते १५ मे २०२५ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. येथील स्मशानभूमी मागील अनेक महिन्यांपासून बंद होती आणि सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्तीनंतर ही स्मशानभूमी खुली करण्यात आली होती, परंतु अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामांसाठी ही स्मशानभूमी बंद ठेवण्यात येत असल्याने महापालिका प्रशासन जनतेला सुविधा देतात की मनस्ताप असा प्रश्न उपस्थित होत आहे.


खारदांडा येथे वायू प्रदूषण प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कामांसाठी स्मशानभूमी बंद ठेवण्यायाचत झोपडपट्टी सुधार मंडळाचे पश्चिम विभागाचे उप अभियंता-५ यांनी महानगरपालिकेला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार ही स्मशानभूमी १ ने २०२५ ते १५ मे २०२५ या दरम्यान बंद राखण्यात येईल. एच पश्चिम विभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी 'एच पश्चिम' विभागातील सांताक्रुझ स्मशानभूमी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुरुस्तीच्या कामानंतर खारदांडा स्मशानभूमीच्या वापराची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.


स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खारदांडा स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आधीच ही स्मशानभूमी दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होती. त्यामुळे याठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याची सूचनाही केली होती. परंतु माचा खर्च वाढत असल्याने त्यांनी खर्चाला काट मारली. परंतु तिच यंत्रणा बसवण्यासाठी महापालिकेला स्मशानभूमी बंद ठेवण्याची वेळ येत आहे. आता सहा महिन्यापूर्वी कुठे ही स्मशानभूमी खुली झाली नाही तोच पुन्हा बंद ठेवावी लागते हे महापालिकेचे मोठे अपयश आहे.


दुरुस्तीचे काम पूर्ण करणार खार दांडा स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षीच करण्यात आले होते, आणि हे दुरुस्तीचे काम करतानाही महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाला या ठिकाणची वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणाही बदलली जावी अशा प्रकारची सुचना स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली होती; परंतु या मागणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करून येथील नागरिकांसाठी खुले करू देण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील

“कालच्या काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला” — आमदार विक्रम पाचपुते

मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या

Dino Morea Arrest: मोठी बातमी! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक

मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या

BEST Bus Route Changes: बेस्टच्या बसमार्गांमध्ये होणार 'हे' महत्त्वाचे बदल! या फेऱ्या होणार रद्द; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी! मुंबईचा चाकरमानी हा आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रवास करताना

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल, सब वे प्रकल्पाचे ३१ जानेवारी २०२७ पर्यंत करणार पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे

Mid Day Meal : महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह

महिला बचत गटांच्या कामांवर स्थायी समिती असमाधानी शिक्षण समिती अध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यक्त केली