विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट नको : चंद्रशेखर बावनकुळे

पुरंदर :पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भू संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध होतोय. शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. त्यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनुकळेंनी सोमवारी माध्यमांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असे बावनकुळे म्हणाले.



यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज भूसंपादनाला विरोध करणाऱ्या अनेक मान्यवरांशी केली. त्यांची मागणी आहे की, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवले गेलेले जे गुन्हे आहेत, ते कमी झाले पाहिजे. पण, काही अधिकाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण झाली, त्याचे काही व्हिडिओ आहेत. या गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्षी सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागले. जे निरापराध आहेत, त्यांचे गुन्हे कमी करू, याबाबत मी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याशी चर्चा करेन.




पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांची पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही, अशी भूमिका आहे. मी त्यांना समजावले. पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. शेतकऱ्यांचा माल आंतराष्ट्रीय स्तरावर निर्यात होऊ शकतो. विकासाच्या बाबतीत मुंबई आणि दिल्लीनंतर पुण्याचा नंबर लागलो. त्यासाठी हे विमानतळ करण्याचा मानस आहे.आणि ही भूमिका सरकार बदलणार नाही, सरकार विमानतळ करणारच आहे. तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी. त्यामुळं मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्ही सात दिवसांच्या आत सांगा. शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, असं सांगत पुरंदर विमानतळाच्या बाबत सुरू असलेले सर्वेक्षण थांबवले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.



काहींनी चुकीच्य रेट डिक्लेअर केला. पण, तिढा सुटावा, यासाठी आम्ही शेतकऱ्यांशी पंधरा दिवसांनी दिवसांनी चर्चा करू. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे,हीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचे नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असे बावनकुळे म्हणाले.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा