पुणे विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिक घट

पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्हयाने बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल लागला. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा ८८.६२ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.



पुणे विभागात २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्हाच अव्वल स्थानी होता. पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचा परिणाम पुणे विभागाच्या निकालात देखील दिसून आला. गैरमार्ग प्रकरणांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. गतवर्षी ९५ इतके गैरमार्ग प्रकरणांची मंडळाकडे नोंद झाली. तर यंदा ६६ इतके गैरमार्ग प्रकरणे नोंदविण्यात आली.




पुणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.



लिंगनिहाय निकालामध्ये पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.०१ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के इतका तर कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के इतका लागला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के आणि तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के इतका लागला.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि