पहलगाम हल्ल्यावर पुतिन यांचा मोदींना फोन, म्हणाले "प्रत्येक कारवाईला पूर्ण पाठिंबा"

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पूर्ण पाठिंबा


नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या (India pakistan Tension)तणावादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.  जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी यावेळी निषेध केला, आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, मोदी आणि पुतीन संभाषणादरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी हल्ल्यामागील आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे यावर भर दिला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी पुतिन यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.



वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना केले आमंत्रित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदीं यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले. यापूर्वी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.



भारत-पाकिस्तान परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सोमवारी बंद दाराआड बैठक होणार आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत, ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि राजनैतिक संबंध मर्यादित करणे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा