HSC Result : सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

बीड : महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते आणि छळ केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात हाहाकार उडाला होता. तसेच देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. याचदरम्यान, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh HSC Result) हिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.



वैभवीला किती टक्के गुण?


नुकतेच दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (HSC Result) जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला (Vaibhavi Deshmukh) ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वैभवीने बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली होती. यामध्ये वैभवीला इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितामध्ये ९४, फिजिक्समध्ये ८३, केमेस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजी विषयात ९८ गुण मिळाले आहेत. तिला एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळाले आहेत. वैभवीच्या या यशाने संपूर्ण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.



माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत


वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झाली आहे. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते.  तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा