Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर शुभम द्विवेदीच्या पत्नीने दिली 'ही' प्रतिक्रिया!

"आज माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळाली"


मुंबई: भारताने पाकिस्तानला उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केलेआहेत. सकाळी १० वाजता लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यात नेमकं ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं याची माहिती देण्यात येईल.
पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. याच हल्ल्यात शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आलं. शुभमचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसह आणि कुटुंबासह काश्मीरला फिरायला आला होता. मात्र २२ तारखेच्या दहशतवादी हल्ल्यात सर्वात आधी शुभमला ठार करण्यात आलं. आता ऑपरेशन सिंदूरनंतर शुभमच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाली शुभम द्विवेदीची पत्नी


मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. माझ्या पतीच्या (शुभम) मृत्यूचा बदला त्यांनी घेतला आहे. मी खूप लहान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी काय सांगणार? पण मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला आहे. मी खरोखरच त्यांची ऋणी आहे. शुभम आज जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल. असं म्हणत शुभम द्विवेदीच्या पत्नीने एअर स्ट्राईकबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

२२ एप्रिलच्या दुपारी काय घडलं होतं?


शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे इतर कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली. आता इश्याना द्विवेदी यांनी सरकारकडे शुभमला शहीद घोषित करावं अशी मागणी केली होती. आज इश्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

 

 
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या