बोगस शिक्षकांसह संस्थाचालकांच्या मनमानीला बसणार चाप

आदेशामुळे शिक्षण विभागात उडाली खळबळ


मुंबई : शिक्षण विभागाने राज्यात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियमबाह्य आणि बोगस शिक्षकांबरोबरच, संस्थाचालकांच्या मनमानीला देखील चाप बसणार आहे. शिक्षण विभागाने संच मान्यतेनुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची मॅपिंग प्रक्रिया सुरू केली आहे. या आदेशामुळे राज्यातील शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.


शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे प्रथमच मॅपिंग होणार आहे. वेतन आणि मंजूर पदे याबाबत शिस्त लावण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. संचमान्यतेनुसार मंजूर पदे आणि वेतनासंबंधीची माहिती जूनपर्यंत एकत्र केली जाणार आहे. ही माहिती न भरणाऱ्या शिक्षकांना वेतनाला मुकावे लागणार असल्याचा सज्जड इशाराच दिला आहे.


शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची मॅपिंग प्रक्रियेची जबाबदारी संबंधित शाळा आणि मुख्याध्यापकांवर निश्चित केली आहे. यासाठी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी)च्या संचमान्यता ‘एपीआय’चा (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) वापर करण्यात येणार आहे. शालार्थ प्रणालीचे अद्ययावतीकरण करून संचमान्यतेतील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी वेतन काढले जाणार आहे. या प्रणालीत नसलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाणार आहे. या आदेशामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.



राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी आहे. या कालावधीतच ही माहिती भरली जाणार असून, त्यानंतर जूनचे वेतन या नवीन प्रणालीद्वारे काढले जाणार आहे. यासंदर्भातील सूचना आणि आदेश राज्यातील सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.


संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीमार्फत शिक्षकांना वेतन अदा केले जाते. अनेकदा ताळमेळ नसल्याने काही खासगी संस्था चालक बोगस माहिती आणि पदे मंजूर नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतरांची अधिकची नावे सादर करत होते. ही नावे शाळांकडून ऑफलाइन पद्धतीने कागदावर सादर केली जात होती. त्यात अनेकदा पदे कमी अथवा जास्त होण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. या प्रकाराला यामुळे चाप बसेल, यामुळे ही मॅपिंग पद्धत वापरली जात आहे.

Comments
Add Comment

Geeta Nagar Cha Maharaja accident : 'गीतानगरचा महाराजा' आगमन सोहळ्यात अपघात; २ टनांच्या ट्रॉलीखाली येऊन चिमुकली गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील दक्षिण कुलाबा (Coolaba News) येथील प्रसिद्ध 'गीतानगरचा महाराजा' (Geetanagarcha Maharaja) गणेशोत्सव मंडळाच्या

Pratap Sarnaik : एसटीच्या आर्थिक सक्षमतेसाठी ‘विना वाहक’ बससेवेला प्राधान्य द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

उत्पन्नवाढीसोबत खर्चात बचत करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग

MSRTC Extra Buses for Ganesh festival : गणपतीसाठी कोकणवारीची लगबग; MSRTCच्या ५,२२० जादा बसेस प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची गावाकडे जाण्यासाठी मोठी लगबग

Sunetra Pawar : केंद्राच्या धर्तीवर राज्यातील साखर कारखान्यांसाठी येणार 'सॉफ्ट लोन योजना'

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश; साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण

Devendra Fadnavis : महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महसूल, वन आणि जमाबंदी विभागाचा एकिकृत डॅशबोर्ड https://www.prahaar.in/2026/09/02/nashik-crime-news-police-raid-in-waghadi-100-grams-of-md-worth-3-lakh-seized/ मुंबई : महाराष्ट्र

Beed-Pune Railway : मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी धावणार बहुप्रतिक्षित 'बीड-पुणे' रेल्वे

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; डिसेंबरमध्ये बीडला मुंबईशी जोडणी मुंबई : बहुप्रतिक्षित