Asangaon-Kasara Megablock: आसनगाव- कसारा रेल्वे मार्गावर 3 दिवस मोठा मेगा ब्लॉक; वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा यार्डयेथील इगतपुरी दिशेकडे जाणाऱ्या अप मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 13आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Asangaon-Kasara Megablock: मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा यार्डयेथील इगतपुरी दिशेकडे जाणाऱ्या अप मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 13आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी नॉन-इंटरलॉकिंग आणि पॉवर ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही रात्री ब्लॉक कलावधीत कसारा आणि खर्डी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे.


13/14 नोव्हेंबर रोजी म्हणजे शुक्रवार-शनिवार या दिवशी रात्री 11:10 ते 1:40 या वेळेत अप मुख्य मार्गिका आणि तिसऱ्या मार्गिकेवर खर्डी-कसारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही रात्री ब्लॉकच्या कालावधीत खर्डी-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, काही लोकल फेऱ्या आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालविण्यात येणार आहेत. 13 आणि 14 नोव्हेंबरला सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी शेवटची लोकल रात्री 8:44 वाजता रवाना होईल. त्यानंतर रात्री 9:32 वाजल्यापासून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल आसनगावपर्यंतच धावण्यात येणार आहेत. तसेच रात्री 11:05 वाजताची सीएसएमटी-कसारा लोकल खर्डी या स्थानकावरच थांबविण्यात येईल. ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर ती कसाऱ्याच्या दिशेने रवाना होईल. कसारा येथून सीएसएमटी कडे सुटणारी शेवटची लोकल रात्री 10 वाजता रवाना होईल. ब्लॉकनंतर 14 आणि 15 नोव्हेंबरला पहाटे 3:51 वाजता कसारा येथून सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल.



या कालावधीत कसारा दिशेने जाणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या कसारा स्थानकात 20 ते 25 मिनिटे थांबवण्यात येणार आहेत. तर 13/14 नोव्हेंबरच्या रात्री एलटीटी-सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस आणि एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेसला उशीर होईल. तसेच दोन्ही रात्री सीएसएमटी-हावडा, एलटीटी-बनारस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.



ब्लॉक कालावधीत काय परिणाम होणार


या काळात खर्डी ते कसारा दरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद राहतील. कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या आसनगाव आणि खर्डी या स्थानकापर्यंतच चालवल्या जातील. तर काही लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील किंवा रद्द केल्या जातील.

Comments
Add Comment

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे आजपासून मुंबईत; ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचा चौथा टप्पा सुरू

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या

KEM Hospital : केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद, स्थायी समिती बैठकीत उमटले तीव्र पडसाद

मुंबई( विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णाला घसरत घसरत उतरावे

BMC : महापालिका स्थायी समितीत सोनियाचा दिवस, विधीमंडळाच्या धर्तीवर महापालिका सभागृहाचे बांधकाम, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांना बसण्यास जागा कमी पडत असल्याने आता

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ऐन दिवाळीमध्ये आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ हाेवून यामध्ये विशेषत:

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा