मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन! साकिनाक्यात नाल्यात उतरून खेळले व्हॉलीबॉल; नालेसफाईच्या दाव्यांची उघड केली पोलखोल!

मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, मोठमोठे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे दाखवण्यासाठी मनसेने आज साकिनाक्यात नाल्यात उतरून एक आगळंवेगळं आंदोलन केलं!


साकिनाका परिसरातील एका नाल्यात इतका कचरा जमा झाला आहे की, मनसेचे कार्यकर्ते चक्क त्या नाल्यात उभं राहून व्हॉलीबॉल खेळले! हा प्रकार पाहणाऱ्यांना धक्का देणारा होता. हे आंदोलन मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.


“महानगरपालिका फक्त मोठ्या नाल्यांची सफाई करते. लहान नाल्यांकडे मात्र दुर्लक्ष होतंय. अधिकारी जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवतायत. त्यामुळे आम्हालाच नाल्यात उतरावं लागलं,” असं भानुशाली यांनी सांगितलं.



ते पुढे म्हणाले, जर लवकरच या नाल्याची योग्य सफाई झाली नाही, तर या नाल्यातील सगळा कचरा उचलून एल वॉर्ड कार्यालयात नेऊन टाकू. दुसरा पर्यायच उरणार नाही, असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.


या आंदोलनामुळे नालेसफाईचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष कामातील गैरकारभार पुन्हा समोर आले आहे. पावसाच्या आधी तरी प्रशासनाला जाग येणार का? की यंदाही मुंबईकरांनी पूर, दुर्गंधी आणि रोगराईला सामोरं जावं लागणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

Comments
Add Comment

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश

सिडकोचा निर्णय! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ Metro Line 8 ने जोडणार; कोणकोणत्या भागांतून धावणार मेट्रो?

मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईकरांचा विमानतळ प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी सिडकोने (CIDCO) अत्यंत महत्त्वाचे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन

प्रदूषणमुक्त मुंबईच्या दिशेने मोठं पाऊल! BEST च्या ताफ्यात 1500 ई- बस दाखल होणार

मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाने गुरुवारी बेस्टच्या ताफ्यामध्ये 1500 वातानुकूलित इलेक्ट्रिक

Asangaon-Kasara Megablock: आसनगाव- कसारा रेल्वे मार्गावर 3 दिवस मोठा मेगा ब्लॉक; वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

Asangaon-Kasara Megablock: मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. आसनगाव-कसारा तिसऱ्या

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे आजपासून मुंबईत; ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचा चौथा टप्पा सुरू

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या