खूशखबर : मान्सून अरबी समुद्रात दाखल

मुंबई : यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज, गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. त्यानुसार यंदाचा मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात साधारण ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नैऋत्य मान्सून आज, गुरुवारी अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात आज (दि.१५) ते रविवार (दि.१८) पर्यंत मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुणे शहराला पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट दिला असून पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.



कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण व लगतच्या भागांमध्ये हवेच्या वरच्या पट्ट्यात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व हवामानातील बदल, चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह, मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्याला 'यलो' अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भात पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा वगळता राज्यामधील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

ई-मेल पाठवता येईना, मीटिंगही रखडल्या...; Microsoft च्या सर्व्हरमधील बिघाडामुळे कामांचा खोळंबा

जगभरात मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक डिजिटल सेवा विस्कळीत झाल्या आहेत. गुरुवार, 12

रसगुल्ला समजून तोंडात टाकला अन् झाला स्फोट! शेजाऱ्याने घेतला तरुणाचा जीव; मध्य प्रदेशात खळबळ

दिंडोरी (मध्य प्रदेश): शेजाऱ्याशी गप्पा मारत शेकोटीची ऊब घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मध्य प्रदेशातील

Katchi Dargah Bidupur Bridge : अखेर प्रतिक्षा संपली! 'नीतीश सेतू' (कच्ची दरगाह-बिदुपूर पूल) सज्ज; २१ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन!

पाटणा : बिहारमधील वाहतुकीची व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत मोठी

PM Modi Bangalore visit : देशाला शिस्तप्रिय आणि सक्षम नागरिक देण्याचे काम एच. व्ही. शेषाद्री यांनी केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेंगळुरू : ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक एच. व्ही. शेषाद्री (H. V. Sheshadri) यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या उभारणीसाठी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा; 15,600 कोटींच्या विकासकामांची भेट, म्हैसूरमध्ये तारांगणाचे उद्घाटन

कर्नाटक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर असून, त्यांचे बंगळूरु येथे आगमन झाले. यावेळी

Odisha Accident : पुरीच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

Accident News: पश्चिम बंगालहून ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसला