भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला अफगाणिस्तानचे समर्थन, पाकिस्तान अस्वस्थ

नवी दिल्ली : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. नंतर पाकिस्तानने भारताच्या सैन्य तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानच्या कारवाईला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे लाँचपॅड, ड्रोनचे लाँचपॅड आदींवर हल्ला केला. भारताच्या या 'ऑपरेशन सिंदूर'ला अफगाणिस्तानचे समर्थन मिळाले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील हा पहिला उच्चस्तरीय राजकीय संवाद होता. या चर्चेवेळी अफगाणिस्तानने पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध केला. अफगाणिस्तानने घेतलेल्या भूमिकेसाठी भारताने आभार व्यक्त केले.


अफगाणिस्तानकडून भारताला पाठिंबा मिळाल्यामुळे पाकस्तानमध्ये अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे.  बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात वातावरण तयार होत असताना अफगाणिस्तान सीमेवरुन पाकिस्तानला विरोध सुरू होण्याची आणि यातून पाकिस्तानची डोकेदुखी वाढण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.


जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार वाढवणे आणि राजनैतिक संबंध अधिक मजबूत करणे यावर चर्चा झाली. देशाच्या प्रगतीसाठी भारत एक विश्वासू आणि महत्त्वाचा मित्र असल्याची भूमिका अफगाणिस्तानने घेतली. दोन्ही देशांच्या ऐतिहासिक नात्याबाबतही चर्चा झाली. मैत्री आणखी दृढ करण्याची भूमिका अफगाणिस्तानने जाहीरपणे घेतली. मुत्ताकी यांनी भारताच्या व्हिसा प्रक्रिया, विशेषतः अफगाणिस्तानातील व्यापारी आणि रुग्णांसाठी सोप्या करण्याची मागणी केली. भारतात बंदिस्त असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्याचीही मागणी अफगाणणिस्तानने भारताकडे केली. जयशंकर यांनी सर्व मुद्द्यांवर भारताच्या सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की भारत राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहे.


भारत - अफगाणिस्तान दरम्यानच्या चर्चेत इराणमधील चाबहार बंदराचाही समावेश होता. हे बंदर भारतासाठी अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठी एक धोरणात्मक मार्ग आहे. ते पाकिस्तानला बायपास करते. याशिवाय, दोन्ही देशांमधील प्रादेशिक सुरक्षा, स्थिरता आणि आर्थिक आणि मानवतावादी सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. याआधी जानेवारी २०२५ मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दुबईमध्ये मुत्ताकी यांची भेट घेतली होती. यानंतर २८ एप्रिल रोजी जॉइंट सेक्रेटरी आनंद प्रकाश यांनी मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली होती. भारत - पाकिस्तान तणाव वाढला असताना काबुलमध्ये भारत अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळांनी व्यापारातील सहकार्य या विषयावर चर्चा केली होती.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा