मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागला

तिकिट दरात २५ रुपयांनी वाढ


उरण : पावसाळ्यात अनियमित जलप्रवासामुळे महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाकडून मोरा ते मुंबईच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (२६ मे ) पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास २५ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे या प्रवासाकरिता प्रवाशांना एका फेरीसाठी ८० ऐवजी १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ चार महिन्यांसाठी लागू राहणार असून १ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा ८० रुपये दर करण्यात येणार आहेत.


गेल्या अनेक वर्षांपासून उरणच्या मोरा ते मुंबई दरम्यानची जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू असते. मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा पावसाळ्यात बंद असते. अशा स्थितीतही समुद्रातील लाटांचा सामना करीत मोरा-मुंबई सेवा सुरू असते. उरण ते नेरुळ बेलापूर ही लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या ही घटली आहे. या घटलेल्या प्रवासी संख्येचा फटका या विभागाला बसला आहे. असे असले तरी या मार्गाने परंपरागत प्रवास करणारे प्रवासी आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू आहे. या सेवेसाठी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मोरा मुंबई जलमार्गासाठी २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.


मोरा – भाऊचा धक्का हा प्रवास फायदेशीर, सुखद आणि जलद म्हणून ओळखला जातो. वाहतूककोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. यात मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. मात्र, तिकीट दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ होत नाही. उलट प्रवाशांना गळक्या प्रवासी बोटींसह इतर समस्यांचा सामना करावा लागतो.


करंजा ते रेवस मार्गावर वाढणार भार


मोरा ते मुंबई प्रमाणेच उरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा रेवस मधील जलसेवा पावसाळ्यात सुरू असते. त्यामुळे अलिबाग ते मुंबई असा प्रवास करणारे प्रवासी हे करंजा रेवस मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशात वाढ होत असल्याने या प्रवाशांचा भार वाढणार आहे.


Comments
Add Comment

'एसआयआर'मध्ये नोटीस बजावलेले ९९.९४ टक्के मतदार पात्र

मुंबई : विशेष मतदारपडताळणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) नोटीस बजावण्यात आलेल्या राज्यातील १ कोटी २२ लाख २४ हजार ७

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा वेग घेतला असून, उपमुख्यमंत्री

Maharashtra Weather : महाराष्ट्रात दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा; पुढील 4 ते 5 दिवस हवामान कसे राहणार?

Maharashtra Weather: महाराष्ट्रात सध्या बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा उष्ण आणि कोरडे वातावरण, तर पहाटे व

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा

Odisha Accident : पुरीच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

Accident News: पश्चिम बंगालहून ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसला

ASEAN Summit : पंतप्रधान मोदी 16 नोव्हेंबरपासून फिलीपिन्स दौऱ्यावर; आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत होणार सहभागी

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 नोव्हेंबरपासून फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार