निफाडला विस्कळीत वीज पुरवठा सुरळीत

वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अथक प्रयत्न


निफाड : सोमवारी सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे निफाड शहर आणि परिसरात एकच कहर उडून गेला. जोरदार पाऊस, वारा, वादळ यामुळे नेहमीप्रमाणे सर्वात मोठा फटका वीज वितरण व्यवस्थेला सोसावा लागला. मात्र, महावितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड परिश्रम करीत अत्यंत कमी वेळात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.


झंझावाती वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडल्या. वाऱ्याचा वेग सहन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, फांद्या पडणे असे प्रकार घडले. वीज वाहक तारांवर झाडे पडली, तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले. निफाड शहरामधील जवळपास ४० ट्रांसफार्मर बंद पडले होते. या सर्व गोष्टींचा अटळ परिणाम म्हणून शहर आणि परिसराचा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता थूल व कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनानुसार गर्द काळोख व रात्रीची वेळ असताना देखील सर्व यंत्रणा वेगाने हलवून तत्काळ सगळीकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शाखा अभियंता योगेश जाधव व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी टप्प्या टप्प्याने एक एक भाग पूर्ववत केला.


काळजीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ग्राहकांचे फोन आल्यास त्यांना वेळोवेळी विद्युत पुरवठा कधी येईल याबाबत अवगत केले जात होते. काही थोड्या ठिकाणांचा भाग सोडता अवघ्या काही तासातच संपूर्ण निफाडचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. विद्युत वितरण कंपनीचे जनमित्र सर्वश्री टबाले, योगेश काळे, विशाल शिंदे, अमोल नागरे, किरण बागुल , सचिन आव्हाड, लाईम झाकरे तसेच निफाड नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले. निफाड शहराबरोबरच कसबे सुकेणे, पिंपळस, नैताळे, नांदूर मधमेश्वर येथील विद्युत पुरवठा देखील तात्काळ दुरुस्त करण्यात आला.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा, 13 तालुक्यांतील लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर

नाशिक : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये पुन्हा वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे देशभरातून

Nashik : कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 11 जण जखमी

Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Nashik : नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार, 4 कोटींचा निधी मंजूर

नाशिक : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वरचा ऐतिहासिक वारसा उजळणार ! 16 प्रकल्पांसाठी 55.72 कोटींचा निधी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक व ऐतिहासिक

Nashik : नाशिकमध्ये दिवाळीच्या उत्साहाला आगीचे गालबोट ! फटाक्याची ठिणगी अन् गोदाम जळून खाक

नाशिक : दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना नाशिक जिल्ह्यात आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी मोठे