Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी कंपनीला सरकारने आवश्यक तो परवाना दिला आहे. दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) लायसन्स दिले आहे. स्टारलिंक आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते. भारती एअरटेल-यूटेलसॅटची वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर स्टारलिंक ही सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवणारी भारतातील तिसरी कंपनी आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सेवा सुरू होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. अॅमेझॉनचा प्रोजेक्ट कुइपर देखील भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी लायसन्स मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

पृथ्वीच्या खालच्या कक्षेत अनेक सॅटेलाइट अर्थात कृत्रिम उपग्रह लावून त्यांच्या मदतीने इंटरनेट दिले जाईल. यासाठी वापरले जाणारे सॅटेलाइट अर्थात कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने दुर्गम भागात प्रभावी ठरणार आहे. भारतातील स्टारलिंकच्या ग्राहकांना २५ ते २२० एमबीपीएस पर्यंत डाउनलोड स्पीड असलेले इंटरनेट मिळेल, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. भारतात स्टारलिंकचा अनलिमिटेड डेटा प्लॅन साडेआठशे ते नऊशे रुपयांत उपलब्ध होईल असा प्राथमिक अंदाज आहे.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि