भारताच्या आजी - माजी खासदारांचा जर्मनीत विवाह

बर्लिन : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बिजू जनता दलचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांनी लग्न केले. भारताच्या या आजी - माजी खासदारांचा विवाह सोहळा जर्मनीत झाला. खासगी समारंभात निवडक पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. हे लग्न ३ मे रोजी झाले. पण त्याची बातमी महिनाभर लपवण्यात आली. अखेर महुआ मोईत्रा यांनी एक फोटो एक्स पोस्ट केल्यावर सर्वांनाच या लग्नाची माहिती मिळाली.

पिनाकी मिश्रा चार वेळा बिजू जनता दलाकडून खासदार झाले आहेत. ते १९९६ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते २००९ ते २०१९ पर्यंत खासदार होते.

महुआ आणि पिनाकीच्या लग्नाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांनी एकमेकांचे हात धरलेले दिसत आहेत. महुआने सोनेरी आणि हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे फोटोत दिसत आहे. लग्नाबाबत दोघांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. पण केक कापत असतानाच फोटो एक्स पोस्ट करुन अभिनंदन करणाऱ्या अनेकांचे महुआ यांनी आभार मानले आहेत. यामुळे खासदार महुआ मोईत्रा आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांनी लग्न केल्याची बातमी व्हायरल झाली आहे.



महुआ यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसाममध्ये झाला. त्या आता ५० वर्षांच्या आहेत. इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या महुआ यांनी २०१० मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महुआ २०१९ मध्ये पहिल्यांदा आणि २०२४ मध्ये दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.संसदेतील तृणमूल काँग्रेसचा आवाज अशी महुआ मोईत्रा यांची ओळख सांगितली जाते. महुआ पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून सलग दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत.

महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलचे नेते आहेत. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५९ रोजी झाला. ते ६५ वर्षांचे आहेत. पिनाकी मिश्रा १९९६ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रजेश किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयातले वरिष्ठ वकील आहेत. त्यांची तीन दशकांची दीर्घ राजकीय आणि वकिलीतली कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्य देखील राहिले आहेत.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि