हवाईदलात होणार ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात लवकरच ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारत देखील अमेरिका, इस्त्राईल आणि ब्रिटनसारख्या देशांच्या यादीत सहभागी होईल. या विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय उच्चस्तरीय बैठकीत मंजुरीसाठी आपला प्रस्ताव ठेवणार आहेत. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये असेल.


आय-स्टार विमाने ही उच्च-उंचीवरील गुप्तचर विमाने म्हणून ओळखली जातात. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला रडार यंत्रणा, मोबाइल हवाई सुरक्षा प्रणालीसारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करता येतील. भारतीय लष्कराच्या पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय या महिन्याच्या अखेरीस उच्चस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची अपेक्षा आहे.



आधुनिक आय-स्टार गुप्तचर विमान डीआरडीओच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्सने विकसित केलेल्या स्वदेशी प्रणालींनी सुसज्ज असेल. त्यांची यशस्वी चाचणी आधीच घेण्यात आली आहे. आय-स्टार विमानाचा वापर उच्च उंचीवरील गुप्तचर माहिती गोळा करणे, देखरेख करणे, लक्ष्य ओळखणे आणि हल्ल्यासाठी केला जाईल.


हे विमान दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामानात काम करू शकेल. याद्वारे शत्रूच्या हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवता येईल. आय-स्टार प्रणाली हवाई आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी काम करेल आणि भारतीय सैन्याच्या सुरक्षा क्षमतांमध्ये अनेक पटीने वाढ करेल. यामुळे देशाला वेळेवर धोके ओळखण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास मोठी मदत होईल.

Comments
Add Comment

Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे.

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये

RBI Rules News :आता तुम्ही बँक खात्याशिवाय पैशांची देवाणघेवाण करू शकता, RBI चा 'हा' नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशांतर्गत मनी ट्रान्सफर (DMT) बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या

PM Narendra Modi : 'तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहात...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला तो रंजक किस्सा, जेव्हा पत्रकारानं दिली होती आनंदाची बातमी

ना फुलं, ना रंगोळीचे रंग; चक्क सोन्याचे दागिने अन् हिऱ्यांनी सजली रांगोळी ! नेटकरीही थक्क

दुबई : सध्या सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना दागिने खरेदी करणं कठीण झालं आहे. अगदी छोटासा

अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर लग्नाची परवानगी, सुधारित अग्निपथ योजनेत मोठा बदल

सशस्त्र दलांमध्ये सेवा देणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने सुधारित अग्निपथ योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे.