Audi India: ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच

मुंबई: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनी (Audi India) ने आज त्‍यांच्‍या फ्लॅगशिप एसयूव्‍हीची एक्‍सक्‍लुसिव्‍ह व्‍हर्जन ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच केली. या कारमध्‍ये प्रीमियम डिझाइन घटक आणि लक्‍झरीअस सुविधांचे सर्वो त्तम कलेक्‍शन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या माहितीनुसार,सिग्‍नेचर एडिशन काळजीपूर्वक निवडलेल्‍या सुधारणांच्‍या माध्‍यमातून क्‍यू७ ची लक्षवेधक उपस्थिती वाढवते, ज्‍यामध्‍ये नाविन्‍यपूर्ण ऑडी रिंग्‍ज एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स आणि नाविन्‍यपूर्ण इस्‍प्रेसो मोबाइल इन-वेईकल कॉफी सिस्‍टम आहे. ९९८१००० रूपयांपासून (एक्‍स-शोरूम Ex Showroom Price) किंमत सुरू होणारी ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन आपल्‍या मालकीच्‍या प्रीमि यम एसयूव्‍हीमध्‍ये विशिष्‍टतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी बीस्‍पोक लक्‍झरी अनुभव देण्‍याप्रती ऑडीच्‍या कटिबद्धतेला सादर करत असल्याचे कंपनीने प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.


ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन मर्यादित युनिट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार साखीर गोल्‍ड, वेटोमो ब्‍ल्‍यू, मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि समुराई ग्रे या पाच आकर्षक एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये येते.


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, 'ऑडी क्‍यू७ भारतातील लक्‍झरी एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये मापदंड स्‍थापित करत आहे,जेथे लक्षवेधक कार्यक्षमता आणि तडजोड न करणाऱ्या लक्‍झरीचे परिपूर्ण संयोजन देते. सिग्‍नेचर एडिशन विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या घटकांना सादर करत या वारसाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. हे घटक मालकीहक्‍क अनुभव खास करतात. वैशिष्‍ट्यपूर्ण ऑडी रिंग्‍स प्रोजेक्‍शन लाइटपासून नाविन्‍यपूर्ण इस्प्रेसो मोबाइल सिस्‍टमपर्यंत प्रत्‍येक सु धारणा ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी निवडण्‍यात आली आहे, जे त्‍यांच्‍या वेईकलकडे त्‍यांच्या सुधारित जीवनशैलीचे विस्‍तारीकरण म्‍हणून पाहतात आणि सर्वोत्तम ऑटोमोटिव्‍ह कारागिरीचे कौतुक करतात.'


सिग्‍नचेर एडिशनची वैशिष्‍ट्ये:


सिग्‍नचेर एडिशन पॅकेज ऑडी क्‍यू७ साठी बीस्‍पोक स्‍टायलिंग सुधारणा देते. हे विशेष पॅकेज विशिष्‍ट लुक देण्‍यासह पुढील वैशिष्‍ट्ये आहेत


ऑडी रिंग्‍स एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, जे आकर्षक वेलकम लाइट प्रोजेक्‍शन निर्माण करतात (नवीन)


डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स, जे चाक गतीमध्‍ये असताना देखील परिपूर्ण ऑडी लोगो ओरिएन्‍टेशन कायम ठेवतात (नवीन)


वेईकल एक्‍सेसकरिता प्रीमियम अनुभवासाठी मेटलिक की कव्‍हर (नवीन)


स्‍टेनलेस स्‍टील पेडल कव्‍हर्स स्‍पोर्टी इंटीरिअर अँसेंटची भर करतात (नवीन)


अनपेक्षित इन-वेईकल पेय अनुभसाठी इस्‍प्रेसो मोबाइल कॉफी सिस्‍टम (नवीन)


ऑडी डॅशकॅमसह ऑडी युनिव्‍हर्सल ट्रॅफिक रेकॉर्डर ड्रायव्हिंग करताना आणि कार पार्क केली असताना अतिरिक्‍त संरक्षण देते (नवीन)


आकर्षक लुकसाठी नवीन आर२० अलॉई व्‍हील्‍सवर स्‍पेशल अलॉई व्‍हील पेंट डिझाइन (नवीन)


ऑडी क्‍यू७ ची इतर वैशिष्‍ट्ये:


शक्तिशाली ३.० लिटर व्‍ही६ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे ३४० एचपी शक्‍ती आणि ५०० एनएम टॉर्क देते, सोबत उच्‍च दर्जाचे परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेसाठी ४८ व्‍होल्‍ड माइल्‍ड हायबिड तंत्रज्ञान


फक्‍त ५.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते, टॉप स्‍पीड २५० किमी/तास


सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये उच्‍च दर्जाचे घर्षण व स्थिरतेसाठी क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह


वैविध्‍यपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवासाठी अँडापटिव्ह एअर सस्‍पेंशन आणि ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह ७ ड्रायव्हिंग मोड्स, तसेच ऑफ-रोड मोड


•विनासायास पॉवर डिलिव्‍हरीसाठी सहजपणे शिफ्ट होणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन


सात-आसनी कन्फिग्‍युरेशनसह अधिक वैविध्‍यतेसाठी इलेक्ट्रिकली फोल्‍डेबल थर्ड-रो सीट्स


ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस पूर्णत: डिजिटल व कस्‍टमायझेबल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर


सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओलुफ्सेन प्रीमियम ३डी साऊंड सिस्‍टमसह १९ स्‍पीकर्स आणि ७३० वॅट्स आऊटपुट


वेईकल फंक्‍शन्‍सवर सर्वोत्तम नियंत्रणासाठी एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह टच प्रतिसाद


सोईस्‍कर कनेक्‍टीव्‍हीटीसाठी ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग


प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्‍ट प्‍लससह ३६०-डिग्री कॅमेरा.


सोईस्‍कर एक्‍सेससाठी कम्‍फर्ट कीसह सेन्‍सर-नियंत्रित बूट लिड ऑपरेशन


प्रीमियम केबिन अनुभवासाठी ४-झोन क्‍लायमेट कंट्रोलसह एअर आयोनायझर आणि अरोमॅटायझेशन.


प्रतिकूल हवामान स्थितींमध्‍ये सुधारित दृश्‍यमानतेसाठी अँडप्टिव्‍ह विंडस्क्रिन वायपर्ससह एकीकृत वॉश नोझल्‍स


नकळतपणे लेन बदलण्‍याला प्रतिबंध करण्‍यास मदत करण्‍यासाठी लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्‍टम


अधिक संरक्षणासाठी संपूर्ण केबिनमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या बसवलेल्‍या आठ एअरबॅग्‍ज


सुधारित वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम.


ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन विशेषत: टेक्‍नॉलॉजी व्‍हेरिएण्‍टसह येते आणि सिग्‍नेचर एडिशनमधील विशेष वैशिष्‍ट्ये ऑडी जेन्‍यूएन एक्‍सेसरीजचा भाग आहेत.

Comments
Add Comment

सरकारी बँकांची शेअर मार्केटमध्ये मोठी झेप! IOB आणि सेंट्रल बँकेच्या हजारो कोटींच्या प्लॅनमुळे उडाली खळबळ!

नवी दिल्ली: भारतीय बँकिंग क्षेत्रात लवकरच मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या अहवालानुसार,

Jacob Bethell News: इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू जेकब बेथेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, क्रिकेटविश्वात खळबळ

लंडन: इंग्लंड क्रिकेट संघाला एक अत्यंत मोठा, धक्कादायक आणि निराश करणारा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू जेकब

मुंब्रामध्ये 58 किलो भेसळयुक्त तूप जप्त, ठाणे पोलीस आणि FDA अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई

ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, धाड सत्र टाकून अन्न भेसळ

स्पाइसजेट कंपनी आर्थिक संकटात? दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल!

मुंबई: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये विमानाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशातील लोकप्रिय एअरलाइन

Pravin Tarde Birthday: तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त विजू मानेंची खास पोस्ट

Pravin Tarde Birthday: 'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 13 आरोपी जेरबंद

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात