"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला, ज्यात भारताला इंग्लंडकडून ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममध्ये २ ते ७ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. याचदरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संजनाने बुमराहची थेट फिरकी घेतली आहे.


२०२१ मध्ये जसप्रीत बुमराह आणि टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन विवाहबंधनात अडकले. त्यांना अंगद नावाचा एक मुलगा देखील आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. जेव्हा संजना भारतातील कोणत्याही मालिकेचे कव्हरिंग करत असते, तेव्हा ती अनेकदा बुमराहची मुलाखत घेताना दिसते. आता त्यांचा 'हू इज द बॉस' या शोमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.





हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांच्या 'हू इज द बॉस' या शोमध्ये जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये बोलताना संजनाने एक मजेदार किस्सा सांगितला, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नाबद्दल बोलताना संजना म्हणाली, "जसप्रीत म्हणाला चला पळून जाऊया, म्हणून मी त्याला म्हणाले, 'तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील?'" संजनाच्या या वक्तव्याने बुमराहची बोलती बंद झाली आणि यावर उपस्थित सर्वजण हसले.


सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला ५ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला, तरी जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजीचा बराचसा भार बुमराहवर अवलंबून आहे. दरम्यान, वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराह पुढील कसोटी सामना खेळणार नाही, अशी चर्चा आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, बुमराह या दौऱ्यात फक्त ३ कसोटी सामने खेळणार आहे.

Comments
Add Comment

Jacob Bethell News: इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू जेकब बेथेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, क्रिकेटविश्वात खळबळ

लंडन: इंग्लंड क्रिकेट संघाला एक अत्यंत मोठा, धक्कादायक आणि निराश करणारा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू जेकब

अमेरिकेच्या निर्बंधांचा दणका! इराणी फुटबॉल संघाच्या विमानाला इराकमध्ये उतरण्यास मज्जाव, खेळाडूंना करावी लागली बसने रपेट

तेहरान: आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातून आणि जागतिक भू-राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक, डोळे दिपवणारी आणि मोठी बातमी

IND vs NZ मालिकेदरम्यान अर्शदीप सिंगचा साखरपुडा! समरीन कौरला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; रोमँटिक फोटो व्हायरल

[caption id="attachment_1074246" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने गर्लफ्रेंड समरीन कौरसोबत

सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक बॅट्स मुंबई क्रिकेट संग्रहालयात होणार दाखल; चाहत्यांसाठी पर्वणी

मुंबई: भारतीय क्रिकेटचा वारसा आणि खेळाचा इतिहास जतन करण्याच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, महान

भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाला...

भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला गवसणी घातली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडियाचाच डंका; शुभमन गिल अव्वल स्थानी, तर रोहित-विराटमध्ये जोरदार चुरस!

[caption id="attachment_1074142" align="aligncenter" width="800"] आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा