IND vs NZ मालिकेदरम्यान अर्शदीप सिंगचा साखरपुडा! समरीन कौरला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; रोमँटिक फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान अर्शदीपने गर्लफ्रेंड समरीन कौर हिच्यासोबत साखरपुडा केला. 11 नोव्हेंबर 2026 रोजी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. न्यूझीलंडमध्ये खास अंदाजात गुडघ्यावर बसून समरीनला अंगठी घालत प्रपोज करतानाचे फोटो सध्या चर्चेत आहेत. अर्शदीपच्या या नव्या सुरुवातीबद्दल क्रिकेट चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

1/5 भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने गर्लफ्रेंड समरीन कौरसोबत साखरपुडा केला आहे. भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान ही आनंदाची बातमी समोर आली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत दोघांनीही आपल्या आयुष्यातील या खास क्षणाची माहिती चाहत्यांना दिली. (Photo: samreenkaur__ Instagram)

2/5 अर्शदीप सिंगने समरीन कौरला अगदी खास अंदाजात प्रपोज केलं. गुडघ्यावर बसून अंगठी घालत तिला आयुष्यभराची साथ देण्याची मागणी करतानाचा त्याचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Photo: samreenkaur__ Instagram)

3/5 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट मालिकेदरम्यान अर्शदीपने न्यूझीलंडमध्येच आपल्या आयुष्यातील हा खास क्षण साजरा केला. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत 11 नोव्हेंबर 2026 ही तारीख आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून जाहीर केली. (Photo: samreenkaur__ Instagram)

4/5 अर्शदीप आणि समरीन यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. यापूर्वीही दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जुलै महिन्यात अर्शदीपने समरीनसोबतचे फोटो शेअर करत आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले होते. (Photo: samreenkaur__ Instagram)

5/5 समरीन कौर ही मनोरंजन आणि ग्लॅमर विश्वातील उगवती अभिनेत्री आहे. तिने पंजाबी म्युझिक व्हिडिओंसोबतच रणवीर सिंगच्या ‘83’ या चित्रपटातही छोटी भूमिका साकारली आहे. तसेच ‘नेल पॉलिश’ या चित्रपटातही ती झळकली होती. मिस इंडिया जम्मू-काश्मीर स्पर्धेशीही तिचे नाव जोडले गेले आहे. (Photo: samreenkaur__ Instagram)
Comments
Add Comment

सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक बॅट्स मुंबई क्रिकेट संग्रहालयात होणार दाखल; चाहत्यांसाठी पर्वणी

मुंबई: भारतीय क्रिकेटचा वारसा आणि खेळाचा इतिहास जतन करण्याच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, महान

भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाला...

भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला गवसणी घातली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडियाचाच डंका; शुभमन गिल अव्वल स्थानी, तर रोहित-विराटमध्ये जोरदार चुरस!

[caption id="attachment_1074142" align="aligncenter" width="800"] आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा

IND vs NZ: चौथ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, शुभमन गिलसह तीन खेळाडू प्लेइंग 11 मधून आउट!

भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि न्यूझीलंडची

IND vs NZ: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ घोषित; दुखापतीतून सावरत 3 खेळाडूंचे पुनरागमन!

New Zealand Test Team vs India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्याचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्याला पंजाब किंग्समध्ये जाताच फायदा, मुंबई इंडियन्समध्ये अर्शदीप सिंगचं जैसे थे

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार