बँक ऑफ बडोदाकडून गृहकर्ज स्वस्त

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करत तो ७.४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शुक्रवारी घोषणा केली. बँकेने कर्ज प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे, ज्यामुळे गृहकर्ज अधिक परवडणारे झाले आहे.


रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात थेट १ टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक ऑफ बडोदाने कर्ज व्याजदरात कपात केली आहे. याआधी जूनमध्ये बँकेने गृहकर्ज व्याजदर ८ टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांपर्यंत कमी केले होते, आता त्यात आणखी ५ आधारबिंदूंची (०.०५ टक्के) कपात केली गेली आहे. नवीन दर येत्या १२ जुलैपासून लागू होणार आहेत.


सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने मात्र रेपो दराशी संलग्न कर्जदरात वाढ केली आहे. येत्या १ जुलै २०२५ पासून तो ८.१५ टक्क्यांवरून तो ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

एकदाच पैसे भरा अन् आयुष्यभर खिशात खुळखुळणार पैसा! LIC ची ही भन्नाट योजना ठरतेय गेम चेंजर

LIC Pension : आयुष्यभरात केलेल्या कष्टाच्या कमाईनंतर म्हातारपणी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये,

Stock Market : दिवसभरातील प्रचंड चढ-उतारानंतर बाजार हिरव्या निशाणावर बंद; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

मुंबई : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज जोरदार तेजीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.

RBI : 31 डिसेंबरनंतर जुने चेकबुक बंद होणार? RBI ने व्हायरल मेसेजमागचे सत्य केले स्पष्ट

Banking News: तुम्ही अजूनही बँकेच्या व्यवहारांसाठी चेकबुकचा वापर करता का? मग सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक मेसेज

Muhurt Trading: दिवाळीच्या निमित्ताने उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग; जाणून घ्या किती वेळ सुरु राहणार शेअर बाजार

दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ८

Stock Market : भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी ! सेन्सेक्स 7 दिवसांत 7,782 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक ठरली आहे. 2 ते 6 नोव्हेंबरदरम्यान

दलाल स्ट्रीटवर खळबळ! सेन्सेक्स तब्बल 1,718 अंकांनी झेपावला, निफ्टीनेही ओलांडला 25,000 चा टप्पा!

मुंबई: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी दिवाळीच्या तोंडावर अभूतपूर्व आणि तुफान तेजी पाहायला मिळाली. खरेदीचा