LIC Pension : आयुष्यभरात केलेल्या कष्टाच्या कमाईनंतर म्हातारपणी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, यासाठी योग्य वेळी प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे असते. सामान्य नागरिकांच्या याच गरजेचा विचार करून एलआयसीने (LIC) एक अत्यंत लोकप्रिय आणि भन्नाट पेन्शन योजना बाजारात आणली आहे, जी 'एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लॅन' (LIC Smart Pension Plan) म्हणून ओळखली जाते.
काय आहे ही योजना आणि कशी मिळते पेन्शन?
ही एक 'इमिएडिएट ॲन्युटी' (Immediate Annuity) प्रकारची योजना आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये तुम्हाला दर महिन्यागणीक किंवा दरवर्षी हप्ते भरण्याची कोणतीही कटकट नाही. रिटायरमेंटच्या वेळी किंवा इतर वेळी तुमच्या हातात आलेली एकरकमी रक्कम या योजनेत एकदाच गुंतवावी लागते. एकदा पैसे जमा केल्यानंतर, तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार लगेचच पुढच्या महिन्यापासून किंवा वर्षापासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.
Banking News: तुम्ही अजूनही बँकेच्या व्यवहारांसाठी चेकबुकचा वापर करता का? मग सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक मेसेज तुमच्याही वाचनात आला असेल. 31 डिसेंबर 2026 नंतर ...
गुंतवणुकीवर मिळणारे भरघोस रिटर्न्स
एलआयसीच्या नियमांनुसार, समजा एखाद्या 60 वर्षांच्या व्यक्तीने या योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर त्याला वार्षिक तब्बल 85,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला ही पेन्शन दरमहा हवी असेल, तर दरमहिना जवळपास 7,083 रुपयांची घसघशीत रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. विशेष म्हणजे, यामध्ये सुरक्षिततेचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही ५ वर्षांच्या वॉरंटीचा पर्याय निवडला, तर वार्षिक 84,500 रुपये (महिना 7,042 रुपये) मिळतात. जसज तुम्ही 10, 15 किंवा 20 वर्षांच्या गॅरंटीचा पर्याय निवडता, तसतसे पेन्शनचे प्रमाण थोडे बदलते; जसे की 20 वर्षांच्या गॅरंटीवर वार्षिक 79,200 रुपये म्हणजेच दरमहा 6,600 रुपयांची खात्रीशीर पेन्शन मिळते.
कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ?
या उत्कृष्ट सरकारी योजनेमध्ये किमान 1 लाख रुपयांपासून गुंतवणूक करता येते. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही भारतीय नागरिक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरते. पेन्शनच्या पर्यायानुसार यामध्ये कमाल वयोमर्यादा ठरवली जाते. जर तुम्हालाही म्हातारपणी नोकरीसारखा दरमहा हक्काचा पैसा हवा असेल, तर एलआयसीची ही स्किम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.