Banking News: तुम्ही अजूनही बँकेच्या व्यवहारांसाठी चेकबुकचा वापर करता का? मग सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक मेसेज तुमच्याही वाचनात आला असेल. 31 डिसेंबर 2026 नंतर सध्याचे चेकबुक बंद होणार असून, 1 जानेवारी 2027 पासून नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये असलेले चेकबुक वापरावे लागेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे अनेक बँक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले जात आहे. ( Cheque Book)
2026 हे वर्ष संपायला आता अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. मात्र, स्मार्टफोनप्रेमींसाठी वर्षाचा शेवट खास ठरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ...
सोशल मीडियावर नेमका काय मेसेज व्हायरल?
WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचे मेसेज फिरत आहेत. नवीन सुरक्षा मानकांनुसार बँका चेकबुक जारी करणार असून, 31 डिसेंबर 2026 नंतर सध्याच्या CTS चेकबुकमधून व्यवहार करता येणार नाहीत, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
त्यामुळे जुने चेकबुक बदलून घ्यावे लागणार का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
जुने चेकबुक बंद होणार का?
व्हायरल मेसेजमधील दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे RBI ने स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या वापरात असलेली CTS चेकबुक पूर्वीप्रमाणेच वापरता येतील.
म्हणजेच, 31 डिसेंबर 2026 नंतर तुमचे सध्याचे चेकबुक बंद होणार नाही. नवीन चेकबुक घेण्याची किंवा जुने बदलण्याची सक्ती नाही. ग्राहकांना सध्याच्या प्रक्रियेनुसार चेकद्वारे व्यवहार करता येतील.
CTS म्हणजे नेमके काय?
CTS म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टम. या प्रणालीमध्ये चेक प्रत्यक्ष एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्याऐवजी त्याची प्रतिमा आणि आवश्यक माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाते. त्यामुळे चेक क्लिअर होण्याची प्रक्रिया जलद होते आणि कागदी चेकच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचतो.
त्यामुळे चेकबुकच्या नियमांमध्ये बदल झाल्याचा कोणताही मेसेज मिळाल्यास त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. बँकिंगशी संबंधित महत्त्वाचे बदल आणि नियम जाणून घेण्यासाठी RBI किंवा आपल्या बँकेच्या अधिकृत सूचनाच तपासा.