कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार, Video सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील KAP'S CAFE वर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांनी कारमधून पिस्तुल काढत कॅफेवर जोरदार फायरिंगचे १० ते १२ राऊंड केले. दरम्यान, या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कॅनडामध्ये कपिल शर्माच्यावर कॅफेवर हल्ल्याची जबाबादीर खालिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने घेतली आहे. हरजीत सिंह लड्डी हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.

सोशल मीडियावर या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात स्पष्ट दिसत आहे की एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात कॅफेवर गोळीबार करत आहे. ही व्यक्ती कारमध्ये बसून अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहे.



 

कपिल शर्माकडून कोणतेही विधान नाही


दरम्यान, या प्रकरणी कपिल शर्मा अथवा त्याच्या टीमकडून कोणतेही विधान समोर आलेले नाही. दरम्यान, पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. कपिलच्या कॅफेवर अनेक राऊंड गोळीबार झाले. कॅफेमध्ये गोळ्यांचे निशाणही आहेत. परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि